“उत्सव काळ शांततेत पार पाडावा” – फैजपूर पोलीस प्रशासनाचे आवाहन.

“उत्सव काळ शांततेत पार पाडावा” – फैजपूर पोलीस प्रशासनाचे आवाहन.

फैजपूर : दि. 15 सप्टेंबर 2025, सोमवार रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात आगामी गणेशोत्सव व दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर अध्यक्षस्थानी होते. तर पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे (पो. स्टे. फैजपूर) व पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे (पो. स्टे. निंभोरा) हे मान्यवर म्हणून विशेष उपस्थित होते.बैठकीत शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, पोलीस पाटील, विविध दुर्गा देवी मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच फैजपूर व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

यावेळी अधिकारी व पोलीस प्रशासनाने गणेशोत्सव व दुर्गोत्सव काळ शांततेत, नियमांचे पालन करून पार पाडावा यासाठी सविस्तर सूचना दिल्या. सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण न करणे, रस्ते मोकळे ठेवणे, प्रतिष्ठापना व विसर्जन ठरलेल्या वेळेत पार पाडणे, गुलालाचा वापर टाळणे, डीजेचा वापर न करणे यावर भर देण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळांनी रात्रीच्या वेळेस सुरक्षिततेसाठी सदस्य नेमणे, गणेश व देवी मूर्तीची विटंबना होणार नाही याची काळजी घेणे, तसेच आक्षेपार्ह गाणी, पोस्टर, बॅनर्स यावर बंदी पाळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.बैठकीदरम्यान सर्व मंडळ पदाधिकाऱ्यांच्या अडचणी व मागण्या प्रशासनाने ऐकून घेतल्या. पोलीस प्रशासनाकडून उत्सव काळात कायद्याचे पूर्ण पालन होईल तसेच नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.शेवटी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले की, “गणेशोत्सव व दुर्गोत्सव हा धार्मिक श्रद्धेशी निगडीत असून तो शांततेत, सुरक्षिततेत व सामाजिक ऐक्याने साजरा करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून आदर्शवत पद्धतीने उत्सव साजरा करावा,” असे आवाहन त्यांनी केले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.