झेप प्रतिष्ठान तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अयोध्या नगर येथे पार पडला.

झेप प्रतिष्ठान तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अयोध्या नगर येथे पार पडला.

जळगाव – झेप प्रतिष्ठान तर्फे अयोध्या नगर परिसरात १० वी व 12 वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा क्रिडा अधिकारी संजीव कुलकर्णी, प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक सुनील खडके,विरेन खडके, प्रदिप रोटे, राजेंद्र पाटील सर व प्रदिप पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला .

१० वी व 12 वी परिक्षेत सर्वोत्तम टक्के असलेल्या, आणि मराठी विषयात सर्वोत्तम मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना फोल्डर फाईल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रिडा क्षेत्रात पण आपले योगदान द्यावे जेणेकरून त्यांना नोकरी मध्ये अधिक गुणांचा फायदा मिळु शकतो असे माजी जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. झेप प्रतिष्ठान एक सामाजिक संस्था असून शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात असे संस्थेचे सचिव अविनाश पाटील यांनी मत व्यक्त केले.
शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना खरच कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर देणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांना शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते असे कार्यक्रमाचे आयोजक सौ हर्षदा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश पाटील, संदिप मांडोळे,जयंत पाटील,मानसी पाटील,हर्षल वाणी, प्रेम भावसार,प्रणय चौधरी, सचिन पवार, यांनी अधिक परिश्रम घेतले होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.