शिक्षक दिनानिमित्त कृतज्ञ सोहळा सत्कार विद्या मंदिर अट्रावल येथे शिक्षकांचा सत्कार.

शिक्षक दिनानिमित्त कृतज्ञ सोहळा सत्कार विद्या मंदिर अट्रावल येथे शिक्षकांचा सत्कार.

सत्कार विद्या मंदिर अट्रावल या शाळेत शिक्षक दिन विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्त शाळेचे चेअरमन आदरणीय श्री. हेमंतकुमार एकनाथ चौधरी यांच्या ७५व्या वाढदिवसा निमित्त शाळेतील सर्व शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व वस्त्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गावचे पोलीस पाटील पवनकुमार हेमंत चौधरी यांनी उपस्थिती लावली. त्यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात शिक्षकांचे कार्य समाजासाठी किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करताना सांगितले की – “शिक्षक हेच खरी राष्ट्रनिर्मितीची बीजे पेरणारे असतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्व विकासात त्यांचा मोलाचा वाटा असतो. अशा गुरुजनांचा सत्कार करून आम्ही त्यांच्या ऋणाची थोडीफार परतफेड करतो आहोत.”

मुख्याध्यापक उमाकांत त्र्यंबक चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. या नाविन्य पूर्ण सत्कार कार्यक्रम विद्यालयात स्टाफचा गौरव केल्या बाबत परिवाराचे धन्यवाद मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .सी. वाणी सर यांनी केले. यावेळी मान्यवर शिक्षकांमध्ये आर.एल. तडवी सर, दीपक बारी सर,  ललित बढे सर, डी.जे. पाटील सर, एन.एस. पाटील सर, पी.व्ही. देशमुख सर, एस.आर. महाजन सर तसेच शिक्षिका सौ. सी.के. चौधरी, अश्विनी पाटील मॅडम, अश्विनी काळबांडे मॅडम, शितल पुरी मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.

शिक्षकेतर कर्मचारी एस.आर. कोळी सर,  एस.आर. मेघे, सचिन झोपे सर यांनाही गौरवण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांचे समाजातील योगदान अधोरेखित करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शाळेत आनंदमय वातावरणात कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.