मनसेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांच्याकडून १० सीसीटीव्ही कॅमेरे सोनी नगर परिसरासाठी भेट म्हणून देण्यात येणार…

सोनी नगरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे प्रतिपादन रात्रीची गस्त वाढवणार: मंदिरात मौल्यवान वस्तू ठेऊ नये.

जळगाव – सध्या सोनी नगरसह पिंप्राळा परिसरात चोरीच्या घटना घडत असून चोरट्यावर आळा बसण्यासाठी सोनी नगरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असून रात्रीची गस्त वाढवणार तसेच मंदिरात मौल्यवान वस्तू ठेऊ नये असे रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी सोनीनगरचा विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाची आरती करतांना प्रतिपादन केले. सोनी नगरात गुरुवारी रात्री ८.३० वाजता पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी बैठक घेऊन त्यानंतर गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी डीबी पथकाचे पोलिस कर्मचारी सुधाकर अंभोरे, सुशील चौधरी,सोनी नगराचे सामाजिक कार्यकर्ते नरेश बागडे, विनोद निकम, मनसेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, सरदार राजपूत, नारायण येवले, यशवंत पाटील, अजय बागडे, सोपान पाटील, भैय्यासाहेब बोरसे, संजय भोई, ताराचंद जोगी, निंबा महाले, हेमंत सूर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सुधाकर अंभोरे, सुशील चौधरी यांचे मंडळाचे कार्यकर्ते केतन पाटील, दीपक महाले, निलेश माळी यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  श्री गुंजाळ पुढे म्हणाले की, सोनी नगरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने मंदिरात मौल्यवान वस्तू ठेऊ नये दानपेटी दर आठवड्याला उघडण्यात यावी तसेच नागरिकांनी बाहेरगावी जाताना पोलिसांना कळवावे, आता रामानंद नगर पोलिस स्टेशन महाबळ कॉलनीत आल्याने अंतर जास्त असल्याने पोलिसांना सोनी नगर मध्ये पोहचता पोहचता वेळ लागू शकतो म्हणून नागरिकांनी लोकसभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.यासाठी रामानंद नगर पोलिस स्टेशन सहकार्य असून पोलिस प्रशासनच्या नेत्रम विभागाला कॅमेरे जोडण्यात येईल त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेसाठी खर्च लागत असल्याने लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.असे ही ते बोलले. श्रीकृष्ण मेंगडे यांच्याकडून १० सीसीटीव्ही कॅमेरे मनसेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांच्याकडून सोनी नगर परिसरासाठी १० सीसीटीव्ही कॅमेरे भेट म्हणून देण्यात येणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी केतन पाटील, दीपक महाले, निलेश माळी, उमेश येवले, पवन भोई, ओंकार जोशी, कृष्णा जोशी, कृष्णा भोई
उदय महाले, पीयुष कोळी, अभिषेक हिवराळे, हेमंत सूर्यवंशी ,वेदांत बागडे,तुषार जाधव,
तसेच सोनी नगरातील महिला मंडळ व युवकांनी परिश्रम घेतले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.