भिम आर्मी आजाद समाज पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत.

भिम आर्मी आजाद समाज पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत.

भुसावळ (प्रतिनिधी) – भिम आर्मी, आजाद समाज पार्टी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार असून सर्वसामान्य मतदारांना त्यांचे हक्क, अधिकार व मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पक्ष काम करणार असल्याचे जळगाव जिल्हा प्रमुख मा. गणेश भाऊ सपकाळे यांनी भुसावळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील निवडणुका पक्ष स्वबळावर की समविचारी पक्षासोबत युती करून लढवायच्या याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनांना भिम आर्मी भारत एकता मिशनचा जाहीर पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले. तसेच भुसावळ रेल्वे विभागातील एससी/एसटी आरक्षण अंतर्गत रिक्त पदांवर पदोन्नतीने भरती करण्यात यावी. सुप्रीम कोर्टाचा निर्णय असूनही काही पदाधिकारी विरोध करीत असल्याने पदे रिक्त आहेत. या विरोधकांवर कारवाई न झाल्यास आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

पत्रकार परिषदेस जिल्हा प्रमुख मा. गणेश भाऊ सपकाळे, जिल्हा उपप्रमुख मा. मुदस्सर भाई खान, जामनेर तालुका प्रमुख व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा. प्रबुद्ध खरे, जिल्हा सचिव मा. वैशाली ताई पाटील, जिल्हा संघटक मा. संदीप भाऊ सपकाळे, भुसावळ तालुका प्रमुख मा. जावेद भाई शेख, तालुका उपप्रमुख मा. अल्केश भाऊ मोरे, रावेर तालुका उपप्रमुख मा. जुम्मा भाऊ तडवी, चोपडा तालुका प्रमुख मा. मुबारक भाऊ तडवी, तालुका संघटक मा. विशाल भाऊ वाघमारे, फैजपूर शहर प्रमुख मा. मोसीन भाऊ तडवी यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.