यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व त्यांचे सहकारी यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ

यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व त्यांचे सहकारी यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ ०५ ऑक्टोबर २०२४ पासून निळे निशाण संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खाल्लावल्याने संघटनेच्या शेकडो संतप्त कार्यकर्त्यानी तहसिलदार कार्यालयावर काढला मोर्चा

शासन – प्रशासनाच्या नियमाचे उल्लंघन करून शासकिय कामात आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून शासन – प्रशासनाला दिशाभूल करणारी माहिती देऊन अनु. जाती / जमातिच्या अनेकांना आपल्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवुन जातियद्वेष भावनेने मानसिक त्रास देऊन अन्याय करणाऱ्या गटविकास अधिकारी व त्यांचे सहकारी यांची चौकशी करून करून कारवाई करण्यात यावी. यावल पंचायत समितिच्या अधिकारी व संबंधितांनी कुठल्या विषयांवर शासन – प्रशासनाची दिशाभुल केली तसेच अनु. जाति /जमातिच्या लोकांवर जाणिव पूर्व अन्याय केला या संदर्भात आम्ही निवेदणात क्रमवारी विषय नमुद केलेले आहेत तरी आपण आम्हाला न्याय देण्याच्या उद्देशाने खालिल नमुद विषयांवर विश्वास करून नाहीतर विचार करून योग्य निर्णय घ्यावा हि नम्र विनंती
१ ) भालशिव ग्रा. प. अंतर्गत टेंभीकुरण गांवाच्या नागरिकांकरिता निर्माण करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या संदर्भात अनेक वेळेस आम्ही लेखी स्वरूपात निवेदण दिले व वेळोवेळी आंदोलने केली तरीही गेल्या दोन वर्षात आम्हाला आमच्या निवेदणाचे उत्तर पंचायत समिती यावल यांच्या कडून मिळाले नाही .
२ ) विभागीय आयुक्त नाशिक यांनी जाहिर केलेल्या सन १९९२ मध्ये अधिसूचने नुसार टेंभीकुरण हे गाव भालशिव ग्रा. प. ला समाविष्ट असून टेंभीकुरण गावातील अनु . जाती / जमातिंच्या लोकांना त्यांच्या मुलभूत हक्कांपासून का वंचित ठेवण्यात येत आहे तसेच दोन वर्षापासून पिण्याच्या पाण्यापासून ते शालेय शिक्षण कामी व इतर महत्त्वाचा कामांकरिता लागणाऱ्या नोंदी तसेच ग्रामसेवक यांचेकडून गावातील अनु . जाती / जमातिचे लोक ग्रामपंचायत चे कर भरण्यास तयार असतांना ग्रामसेवक यांचेकडून ग्रा . प . कर स्विकारण्यास नकार देण्या संदर्भात चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्यात यावी .

३ ) जाणिवपुर्वक व्देषभावनेतून दहिगाव – सावखेडा येथिल रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल योजने संदर्भात झालेली अनियमितता व झालेला गैरप्रकार याची चौकशी तसेच गटविकास अधिकारी यांच्या मनमानी मुळे सावखेडा येथिल रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल लाभापासून वंचित राहिलेल्या अनु . जातिच्या लाभार्थीवर झालेल्या अन्यायाच्या संदर्भात चौकशि करून कारवाई करण्यात यावी .
४ ) आज रोजी गेल्या आठ ते दहा वर्षापासून शासनाच्या नियमांची पायमंल्ली करून तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशाला न जुमानता पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किशोर सपकाळे हे मनमानी कारभार करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती यावल येथे तळ ठोकून बसलेले आहेत त्यामुळे सन २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे तरी त्यांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करून तात्काळ विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांचि बदली करण्यात यावी .

गेल्या दोन वर्षात जाणिवपुर्वक द्वेषभावनेतून टेंभाकुरण गांवातील दलित – आदिवासी समाजावर अन्याय करण्यात आलेला असून तसेच टेंभीकुरण रस्त्याच्या संदर्भात वारंवार पंचायत समिती यावल गटविकास अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांकडून व त्यांच्या सहकाऱ्यांनी शासन – प्रशासनाची दिशाभुल केल्या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात यावी ही विनंती असे निवेदन महोदया मोहनमाला नाझिरकर यांना देण्यात आले त्याप्रसंगी संघटनेचे शेकडो महिला – पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.