गणेश चतुर्थी च्या मुहूर्तावर पारोळा पोलिसांकडून बहादरपूर शिवारातील बनावट दारूचा कारखाना उध्वस्त,

पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील बाहादरपुर शिवारातील पोलिसांकडून तीन आरोपी अटक केल्याची प्राथमिक माहिती मागच्या दोन वर्षापूर्वी देखील शहरातील कॉलनी भागात बनावट दारू कारखान्यावर अशीच कारवाई करण्यात आली होती. तो विषय सध्या न्यायप्रविष्ट असेल. आजच्या कारवाई ही पारोळ्याचे डॅशिंग पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यामध्ये मोठं रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. या रॅकेट मधील मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता असल्याचे जनतेमधून बोलले जात आहे.









