गुर्जर प्रतिहार सम्राट मिहीर भोज यांची जयंती निंभोरा बु॥ येथे उत्साहात साजरी,

निंभोरा बु॥ ता. भुसावळ (प्रतिनिधी) – आज दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी गुर्जर प्रतिहार सम्राट महान राजा मिहीर भोज यांची जयंती विठ्ठल मंदिर निंभोरा बु॥ येथे सकाळी 10 वाजता उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजाचे जेष्ठ नागरिक रामसिंग चौधरी यांनी स्वीकारले. प्रारंभी सम्राट मिहीर भोज यांच्या प्रतिमेचे पूजन सुकदेव चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पाटील यांनी केले तर रेखा पाटील यांनी सम्राट मिहीर भोज यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
समारोपाचे अध्यक्षस्थान घेत रमाकांत चौधरी, प्रदेश संघटन महामंत्री, अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा महाराष्ट्र यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मान्यवर म्हणून रामसिंग चौधरी, सुकदेव चौधरी, बाळकृष्ण पाटील, ईश्वर पाटील, बंडू पाटील, सुनिल चौधरी, श्रीराम पवार, विवेक पाटील, वैभव चौधरी, दिलीप चौधरी, प्रथमेश पाटील, चंद्रकांत पाटील, चेतन पाटील आदींसह महिला प्रतिनिधींमध्ये ज्योती पवार (प्रदेश उपाध्यक्ष, अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा महाराष्ट्र), अनुसया पाटील, सुमन चौधरी, जिजाबाई चौधरी, कोकीळा चौधरी, रेखा पाटील, वंदना पाटील, कल्पना पाटील यांची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहून जयंती सोहळ्याला उत्सवी वातावरण प्राप्त करून दिले.









