रेल्वे स्टेशन परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा पहिला रिक्षा थांबा सुरू.

रेल्वे स्टेशन परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा पहिला रिक्षा थांबा सुरू.

जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा पहिला रिक्षा थांबा रेल्वे स्टेशन परिसरात कार्यान्वित झाला. यानिमित्ताने रेल्वे स्टेशन परिसरातील वीस रिक्षांना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे ओळखपत्रीय स्टिकर लावण्यात आले. या उपक्रमामुळे प्रवाशांना शिस्तबद्ध व सुसंगत रिक्षा सेवा उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर तसेच जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रिक्षांना स्टिकर लावून वाहतूक सेनेचा उपक्रम सुरू करण्यात आला. उपक्रमाचे नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सुरक्षा जिल्हा संघटक रज्जाक सय्यद व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी महेंद्र सपकाळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले.

या वेळी उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, चेतन पवार, श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, सतीश सैंदाने, संजय मोती, साजन पाटील, विकास पाथरे, भुसावळ तालुका वाहतूक सेनेचे अध्यक्ष दीपक सोनवणे, विशाल जाधव, हारून शेख, अरुण पटेल, अन्नू बिस्ती, रौफ खाटिक, महेंद्र सपकाळे, विजय कोळी, एकनाथ काळे, राजेश कोळी, भीमराव जगताप, रामचंद्र चव्हाण, पांडुरंग चव्हाण, मोसिन शेख, किरण पाटील, अतुल साळुंखे, अनिल राठोड, विनोद रायपूर, शांताराम वाघ, जीवन बारी, राहुल पाटील, हेमंत पाटील, अभिजित जाधव, कुणाल महाजन, नितीन जाधव, सतीश पाखरे, राजेश शेळके, विशाल कुमावत, राहुल चव्हाण आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा शहरातील हा पहिला उपक्रम असल्याने रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मनसेच्या वाहतूक सेनेच्या माध्यमातून पुढील काळात शहरातील विविध भागात असे रिक्षा थांबे सुरू करण्याचा मानस नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी आवाहन करण्यात आले की, रिक्षाचालक, शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक तसेच मिनी बस चालकांनी देखील महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सभासद व्हावे. इच्छुकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.