Pune Drugs Case : ड्रग्स पार्टी प्रकरणात खेवलकरांचा पाय खोलात, ‘त्या’ एका कारणामुळे रोहिणी खडसे सुद्धा अडचणीत, काय घडलं?

Pune Drugs Case News : राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजले. दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत राहिली. अशातच या प्रकरणात आणखी एक अपडेट आली.

संपूर्ण राज्यात गाजणाऱ्या पुण्यातील खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणातील आरोपी असणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये असणारा व्हाट्सअप डिलीट करून महत्त्वाचा पुरावा नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे केवलकर यांना जामीन दिल्यास ते पुराव्याशी छेडछाड करू शकतात म्हणून त्यांना जामीन नाकारण्यात यावा, असं लेखी म्हणणं पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे.

प्रांजल खेवलकर यांच्या वकिलाने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या संदर्भात न्यायालयाने पुणे पोलिसांना आपली बाजू मांडण्यास सांगितलं होतं. त्यानुसार पोलिसांनी आपलं म्हणणं सविस्तर लेखी स्वरुपात मांडल आहे. ‘तपासादरम्यान खेवलकरांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले होते, त्यापैकी एका मोबाइलमधील सीम कार्ड हे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांकडून या मोबाइलचा तांत्रिक पंचनामा सुरू असतानाच, सीम कार्डच्या मूळ मालकाने जळगावमध्ये टेलिकॉम कंपनीकडे ‘सीम कार्ड हरवले आहे,’ असे सांगत नवीन सिमकार्ड मिळवले.

हे नवीन सिमकार्ड नंतर दुसऱ्या मोबाइलमध्ये टाकून या व्हॉट्सॲप सुरू केले या व्हॉट्सॲपमधून आवश्यक ती माहिती घेतल्यानंतर त्‍याने ती तत्काळ डिलीट करून टाकत आरोपींकडून पुरावा नष्ट करण्याचा स्पष्ट प्रयत्न केला आहे, असं लेखी म्हणणं पुणे पोलिसांनी न्यायालयात मांडले आहे. आता या प्रकरणी आणखी कलमे वाढवली जाण्याची शक्‍यता आहे. तसेच आरोपींची संख्या सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये फक्त प्रांजल खेवलकरच नाही तर त्यांच्या निकटवर्तीयांसह पत्नी रोहिणी खडसे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. पुराव्याशी छेडछाड केल्याप्रकरणी प्रांजल खेवलकर याचा निकटवर्ती यांचा हात असून त्या संदर्भात चौकशी सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल आहे.

Related Posts

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.