स्व. बापुजी युवा फाऊंडेशनतर्फे शासकीय कर्मचाऱ्यांना मोफत रेनकोट वाटप.

पावसाळ्याच्या काळात न थांबता सेवा देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या समर्पणाला सलाम करत,शिवसेना-युवासेना व स्व. बापुजी युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रेनकोट वाटप उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

हा उपक्रम स्व. बापुजी युवा फाऊंडेशनचे संस्थापक व माजी नगरसेवक लखीचंद पाटील यांच्या कन्या कु. लक्षिता लखीचंद पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त समाजहितासाठी सलग तिसऱ्या वर्षी साजरा करण्यात आला. पावसात आपल्या कर्तव्यापासून न हटणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना रेनकोट स्वरूपात मदतीचा हात देत, समाजसेवा आणि जबाबदारी यांचा आदर्श दाखवत हा उपक्रम राबवण्यात आला. “वाढदिवस केवळ आनंदाचा नाही, तर समाजाला काहीतरी परत देण्याचा दिवस असावा”, या भावनेतून राबवलेला हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला. कार्यक्रमावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, युवराज पाटील (समन्वय समिती), मा. नगराध्यक्ष गणेशआण्णा परदेशी, डॉ. प्रमोद पाटील (वैद्यकीय आघाडी), तालुकाप्रमुख सुधाकर पाटील, समाधान पाटील, इम्रान अली सय्यद (अल्पसंख्याक अध्यक्ष), शहरप्रमुख आबा चौधरी, मा. नगरसेवक जग्गू भोई, जितू आचारी, देवा आहिरे, महेंद्र ततार, पिंटू मराठे, युवासेना जिल्हासंघटक निलेश पाटील, शहरप्रमुख चंद्रकांत वाघ, दिलीप भोई, विनोद भोई, शिवशाही प्रतिष्ठानचे निलेश पाटील, तेजस पाटील, वाल्मिक पवार, दर्शन शिंपी, दिग्विजय पाटील, कृष्णा पाटील यांसह फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आणि शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.