वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये भयंकर प्रकार, कैद्याच्या अंडरवेअरमध्ये निघाला चिरलेला रबरी बॉल; पोलिसांनी झाडाझडती घेतली अन्…

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड शिक्षा भोगत असलेले बीड जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा कारागृह (Beed District Jail) सतत चर्चेचा विषय ठरत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराड (Walmik karad) आणि त्याची टोळी सध्या याच कारागृहात शिक्षा भोगत आहे. वाल्मिक कराडला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप झाल्यानंतर या कारागृहाची राज्यभरात चर्चा रंगली होती. तसेच कराड गँग आणि गित्ते गँग यांच्यात तुरुंगातच गँगवॉर झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. आता बीड जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

वाल्मिक कराड शिक्षा भोगत असलेल्या बीड जिल्हा कारागृहात एका आरोपीकडून गांजासदृश पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कारागृहामध्ये अंमली पदार्थांची तस्करी कोण करतंय? याबाबत विविध तर्कवितर्कांना ऊत आला आहे. संबंधित न्यायालयीन बंदीकडून गांजासदृश पदार्थ जप्त करण्यात आला असून, दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई आणि पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारागृहात गांजासदृश पदार्थ सापडल्याने खळबळयापूर्वी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याच्या आरोपांमुळे बीड जिल्हा कारागृह चर्चेत आले होते. आता त्याच कारागृहात गांजासदृश पदार्थ सापडला आहे. सुभेदार बलभीम चिचाणे आणि पोलीस हवालदार अब्दुल वाजेद अब्दुल अजिज हे कर्तव्यावर असताना बराक क्रमांक 7 मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदी अक्षय ऊर्फ चिंटू मिठ्ठू गायकवाडची हालचाल संशयास्पद वाटली. बीड जिल्हा कारागृह पुन्हा चर्चेत त्याची झडती घेतली असता, त्याच्या अंडरविअरमध्ये रबरी फिकट आकाशी रंगाचा चिरलेला बॉल आढळून आला, ज्यामध्ये गांजासदृश पदार्थ सापडला. तसेच, त्याच्या पँटच्या खिशात असलेल्या पुडीत हिरवट रंगाचा पाला, बारीक भुरकट पदार्थ, हिरवट रंगाची फुले, बिया, बोंडे आणि काड्या असा अंमली पदार्थसदृश मुद्देमाल मिळाला. हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अक्षय गायकवाडविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे बीड जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.