शिवसेना जमीनदोस्त करू, गिरीश महाजनांच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंचा जोरदार प्रहार; म्हणाले, या वृक्षाची मुळं…

मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे, असे वक्तव्य केले होते. विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) मोठी गळती सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे एकामागे एक नेते पक्षाला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेना जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे, असे वक्तव्य केले होते. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना गिरीश महाजन यांच्या दाव्यावर प्रश्न विचारला. उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना जमिनीची दोस्त आहे. म्हणून तुम्ही कधीच शिवसेना संपवू शकत नाही. तुम्ही जमीनशत्रू आहात आमचे पाय जमिनीवर आहेत आणि या वृक्षाची मूळ खाली मातीत खोलवर रुतली आहेत. तुम्ही (भाजपा) जमिनीचे शत्रू आहात. म्हणूनच मुंबईसह सगळी जमीन मोदींच्या मित्राच्या (गौतम अडाणी) घशात घालू पाहताय. तुम्ही जमीनशत्रू आहात, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.  उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका अमित शाह व निवडणूक आयोगाने जी शिवसेना दुसऱ्यांच्या हातात दिलीय, ती अशा प्रकारे भाजपमध्ये कशी विलीन करू शकतात? शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा हा प्रयत्न आहे का? असे उद्धव ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले की, पण ते संपवू शकत नाहीत. इतकी वर्षे होऊनही ते जनतेला माझ्यापासून तोडू शकत नाहीत. त्यामुळे ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’ करायचं आणि मालकांच्या पक्षात विलीन व्हायचं हा शेवटचा पर्याय त्यांच्यापुढं आहे. मी याआधी बोललो आहे की, निवडणूक आयोग कदाचित आमचं निवडणूक चिन्ह दुसऱयाला देऊ शकतो किंवा गोठवू शकतो, पण ‘शिवसेना’ हे नाव ते दुसऱयाला देऊ शकत नाहीत. त्यांना तो अधिकारच नाही. कारण हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का? या धोंड्याला पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही वेडंवाकडं वागलो असू तर गोष्ट वेगळी, पण संविधानानुसार आम्ही काही चूक केली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाहीत. मतांची टक्केवारी वगैरे जे काही असेल ते चिन्हापुरतं आहे. नाव दुसऱ्याला देऊ शकत नाहीत, असे हल्लाबोल त्यांनी केला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.