भरधाव डिझायर गाडीने बैलगाडीला जोरदार धडक – शेतकरी व बैल गंभीर जखमी.

भडगाव-कजगाव रस्त्यावर रविवारी दुपारी एक गंभीर अपघात घडला. भडगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या डिझायर गाडी (क्रमांक MH 02 BR 1601) ने बैलगाडीला जबर धडक दिली. या अपघातात कोठली येथील शेतकरी विजय पाटील गंभीर जखमी झाले असून दोन्ही बैलांच्याही पायांना गंभीर इजा झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास जळगाव-चांदवड महामार्गावरील कोठली फाट्याजवळ शेतीचे काम आटोपून घरी परतणाऱ्या बैलगाडीला भरधाव डिझायर कारने जबरदस्त धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की बैलगाडी अक्षरशः चकनाचूर झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमी शेतकऱ्याला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले, तर बैलांना जागेवर प्राथमिक उपचार करण्यात आले. शेतकरी विजय पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून अपघाताची माहिती मिळताच भडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास व कारवाई सुरू केली आहे. भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वाहनचालकांच्या बेफिकीरपणामुळे शेतकऱ्यांचे व बैलांचे प्राण संकटात येत असल्याचे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.