दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये यूएव्ही (अनमॅनेड एरियल व्हेईकल) आणि सी-यूएएस (काउंटर-अनमॅनेड एरियल सिस्टम) च्या प्रदर्शनात सीडीएस यांनी हे सांगितले.कालच्या शस्त्रांनी आपण आजची लढाई जिंकू शकत नाही. परदेशातून आयात केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्याने आपली युद्ध तयारी कमकुवत होते, असे परखड प्रतिपादन संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केलं आहे. सीडीएस म्हणाले की, यामुळे आपण कमकुवत होत आहोत. ऑपरेशन सिंदूरने आपल्याला दाखवून दिले की आपल्यासाठी स्वदेशी सी-यूएएस (काउंटर-अनमॅनेड एरियल सिस्टम) म्हणजेच ड्रोनविरोधी प्रणाली असणे का महत्त्वाचे आहे. आपल्याला आपल्या सुरक्षेसाठी गुंतवणूक करावी लागेल.ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने निशस्त्र ड्रोनचा वापर केला. बहुतेक ड्रोन पाडण्यात आले. ते आपल्या कोणत्याही लष्करी किंवा नागरी पायाभूत सुविधांना कोणतेही नुकसान पोहोचवू शकले नाहीत. ड्रोन उत्क्रांतीवादी आहेत, युद्धात क्रांतीकारी वापर.










