निळु फुले स्मृती कलागौरव पुरस्कार सामाजिक चळवळिचे प्रबोधन,,,,,,, चंद्रकांत गवळी.

सिंहगड रोड,,,,, विष्णू गरुड संचालित विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने निळु फुले स्मृती कलागौरव पुरस्कार सोहळा (वर्ष १७वे)दि. १३जुलै रोजी विश्वकर्मा विराट संघाचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते पुण्यात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी म.भा.चव्हाण होते. विचारपिठावर सुनिल माने(राज्य प्रवक्ते रा.काॅ. शरद पवार गट),प्रमोद मनोरे,अशोक रामटेके, कैलास सुतार (माजी सरपंच),आशा वाकचौरे , तुषार कदम, प्राचार्य गौतम मगरे(आपटे प्रशाला),गौतम बेंगाळे(माजी प्राचार्य) ईत्यादि मान्यवर उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत गवळी म्हणाले कि सर्वसामान्य वर्गातील गुणीजनांचा शोध घेऊन त्यांना निळु फुले स्मृती कलागौरव पुरस्काराने गौरवणे म्हणजेच निळु फुले यांच्या सामाजिक कार्याला ऊजाळा देणे होय. हा पुरस्कार सोहळा म्हणजे सामाजिक प्रबोधनाची चळवळ आहे. सुतार काम करीत पुरस्कार सोहळ्यात सातत्य ठेवणे हे विष्णू गरुड यांचे धाडस म्हणावे लागेल. यावेळी सुनील माने म्हणाले निळु फुले यांनी महात्मा फुलेंचा वारसा सामाजिक क्षेत्रात पुढे चालवला. ज्येष्ठ कवी म.भा.चव्हाण आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की बदलणाऱ्या सामाजिक प्रवाहात अध्यात्म आणि मोक्ष यांचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. उपेक्षित वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणे हि काळाची गरज आहे.यातच अध्यात्म आहे,आणि मोक्ष प्राप्ती आहे. यावेळी युपीएससी मध्ये महाराष्ट्रात दुसरा आलेला शिवांश जागडे, अभिनेत्री अर्चना पाटिल, सामाजिक कार्यकर्ते शरद दबडे, रविंद्र रायकर,क्रिडा पटु स्नेहल बारवकर,मानसी ताजणे यांना निळु फुले स्मृती कलागौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल कांबळे,सुत्र संचालन संस्थापक विष्णू गरुड, आभार प्रदर्शन रमाकांत देशमुख,संयोजन सचिन थोपटे यांनी केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.