लांडोरखोरी उद्यानास ‘अरण्यऋषी’ मा. मारुती चितमपल्ली यांचे नाव देण्याची मागणी.

जळगाव – शहरातील लांडोरखोरी येथील सार्वजनिक उद्यानास ‘अरण्यऋषी’ पद्मश्री मा. मारुती चितमपल्ली यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मनसेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर व शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन याबाबतचे सविस्तर निवेदन सादर केले.पद्मश्री मा. मारुती चितमपल्ली हे प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ, पक्षी व वन्यजीव अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक होते. त्यांनी आपल्या लेखनातून आणि कार्यातून पर्यावरणप्रेमींच्या अनेक पिढ्यांना जागृत आणि प्रेरित केले. ‘अरण्यऋषी’ ही उपाधी प्राप्त असलेले चितमपल्ली यांनी निसर्गसंवर्धनासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते.

वर्ष २००९ मध्ये जळगाव येथे पार पडलेल्या ‘वसुंधरा महोत्सवा’त त्यांनी उपस्थित राहून जळगावकरांना आपल्या विचारांनी समृद्ध केले होते. त्यामुळे त्यांचे जळगाव शहराशी असलेले भावनिक नाते अधोरेखित होते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. या मागणीमागे पर्यावरण जपण्याची जाणीव निर्माण करणे, नव्या पिढीला प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणे आणि मा. चितमपल्ली यांच्या कार्याचा गौरव करणे, असे उद्दिष्ट आहे. लांडोरखोरीसारख्या नैसर्गिक परिसरात त्यांच्या नावाचे स्मारक स्वरूपात नाव देणे, हीच खरी मानवंदना ठरेल, असे मनसेच्या प्रतिनिधींनी सांगितले.जिल्हाधिकारी महोदयांनी या मागणीवर सकारात्मक विचार करून तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.याप्रसंगी मनसेचे नेते माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर साहेब जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, प्रसिद्धी प्रमुख सतीश सैदाने, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, सचिव जितेंद्र पाटील, दीपक राठोड, संजय मोती, विकास पाथरे उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.