मासेमारीसाठी गेले आणि आक्रीत घडलं, कुटुंबांवर दु:खाचा डोंगर; नागपुरात हसत्या-खेळत्या मुलांचा दुर्दैवी अंत.

नागपूर जिल्ह्यातील वाडीजवळ दुर्दैवी घटना घडली. खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. हे दोघे मित्र मासेमारीसाठी गेले होते. खड्ड्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. वाडी पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात शोक पसरला आहे.नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वाडी नगरपरिषद क्षेत्रातील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या आटे लेआउटमधील पाच मित्रांची मासेमारीची भटकंती दोन कुटुंबांसाठी काळरात्र ठरली. गुरुवारी दुपारी लावा दावलमेती रोडवरील एका शेतातील पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये प्रबोधनकार ठाकरे शाळेत नववीत शिकणारा आटे लेआउटचा रहिवासी धीरज नारनवरे (१४) आणि विश्वनाथ बाबा हायस्कूलमध्ये दहावीत शिकणारा म्हाडा कॉलनीचा रहिवासी नैतीक विपिन वानखेडे (१६) यांचा समावेश आहे. गुरुवारी दुपारी सुमारे १२ वाजता धीरज, नैतीक आणि त्यांचे तीन मित्र लावा रोडच्या दिशेने निघाले. घरी कोणालाही न सांगता ते सर्वजण फिरण्यासाठी गेले होते. भटकंती करताना हे पाचही मित्र लावा ग्रामपंचायतीच्या आठव्या मेल रोडवर असलेल्या दिलीप भगत यांच्या शेतात पोहोचले. शेतात काही वैयक्तिक कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता, ज्यात पावसाचे पाणी साचले होते.वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये प्रबोधनकार ठाकरे शाळेत नववीत शिकणारा आटे लेआउटचा रहिवासी धीरज नारनवरे (१४) आणि विश्वनाथ बाबा हायस्कूलमध्ये दहावीत शिकणारा म्हाडा कॉलनीचा रहिवासी नैतीक विपिन वानखेडे (१६) यांचा समावेश आहे. गुरुवारी दुपारी सुमारे १२ वाजता धीरज, नैतीक आणि त्यांचे तीन मित्र लावा रोडच्या दिशेने निघाले. घरी कोणालाही न सांगता ते सर्वजण फिरण्यासाठी गेले होते. भटकंती करताना हे पाचही मित्र लावा ग्रामपंचायतीच्या आठव्या मेल रोडवर असलेल्या दिलीप भगत यांच्या शेतात पोहोचले. शेतात काही वैयक्तिक कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता, ज्यात पावसाचे पाणी साचले होते.दरम्यान, जवळच असलेल्या जेसीबी चालकाने तात्काळ जेसीबीसह घटनास्थळी धाव घेतली. इतर तीन मित्र घाबरून घरी परतले आणि त्यांनी आपल्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच लावा गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित नितनवरे काही लोकांसह घटनास्थळी पोहोचले. वाडी पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गोताखोरांच्या मदतीने धीरज आणि नैतीक यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.