विद्यार्थ्यांच्या अंगी सभाधैर्य, धाडस, साहस, पाठांतर, विषय प्रतिपादन, वेळेचे नियोजन, श्रद्धा आणि भक्ती हे गुण विकसित व्हावेत, यासाठी वाङ्मय मंडळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण (ता. रावेर) येथे आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेनिमित्त वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.दी एज्युकेशन संस्थेचे माजी सचिव हेमंतराव एकनाथराव चौधरी यांनी सन्मानार्थ दिलेल्या “अमृतस्य पुत्राः” या गुरुपरंपरेचे दुर्मिळ चित्रप्रतीक व वेदांची देवता माता सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र काशिनाथ चौधरी होते. वाङ्मय मंडळातर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संस्थेतर्फे कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र चौधरी संचालक मधुकर कोल्हे यांनी सर्व गुरुजन व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.










