सुतार समाजाचे पारंपरिक कला कौशल्य, व्यवसाय व योगदान लक्षात घेता केंद्र सरकारने जाहीर केलेल्या “प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024” अंतर्गत सुतार समाजाचा ‘सुतार जात’ म्हणून पुन्हा समावेश करण्यात यावा, अशी ठाम मागणी विश्वकर्मा विराट संघ, महाराष्ट्र यांनी केली आहे केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी जातनिहाय ‘सुतार’ हे नाव २०२४ नंतर Online System मध्ये उपलब्ध नाही. १८ पारंपरिक धारदार हत्यारांनी (उदरनिर्वाह) व्यवसाय करणाऱ्या जातींसाठी ही योजना लागू असून सप्टेंबर २०२3 पासून १८ जातींच्या यादीत ‘सुतार’ समाजाचा स्पष्ट उल्लेख आहे. आता ऑनलाइन फॉर्ममध्ये ‘सुतार जात’ नसल्याने अनेकांना योजना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. उत्तर प्रदेश व हरियाणामध्ये ‘सुतार जात’ अनुसूचित जाती (SC) म्हणून ओळखली जाते, पण महाराष्ट्रात ओबीसीमध्ये आहे. त्यामुळे डिजिटल प्रणालीत भ्रम निर्माण होत आहे आणि हरियाणा व उत्तर प्रदेश मध्ये सुतार जातीस ‘बढई’ शब्दानी ओळखले जाते. त्यात ‘सुतार’ गट मिसळला जातो. परंतु मध्य भारतातील राज्यांमध्ये सुतार म्हणून ओळखले जाणाऱ्या या जातीस सदर योजनेत न्याय मिळत नाही. म्हणून राज्यनिहाय सुतार जातींना वेगवेगळ्या शब्दांनी उच्चारले जाते. राज्यनिहाय ओबीसी यादीमध्ये महाराष्ट्रात सुतार या शब्दाने ओळखले जाते तसेच जातीच्या दाखल्यामध्ये व शाळेच्या दाखल्यामध्ये सुतार हा उल्लेख असतो. म्हणून केंद्रीय पीएम विश्वकर्मा योजनेत सुतार नावाचा उल्लेख झाला तरच सुतार समाजाला न्याय मिळेल.










