मला धक्का का दिला विचारणाऱ्या महिलेचा रिक्षाचालकाने केला विनयभंग, नवी मुंबईतील खळबळजक घटना.

नवी मुंबईत एका रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केला. पनवेलमधील पिल्लई कॉलेजच्या रस्त्यावर ही घटना घडली. रोहित गडे नावाच्या रिक्षाचालकाने महिलेला धक्काबुक्की केली, गैरवर्तन केले आणि धमकीही दिली. महिलेने खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रोहित गडे याला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पीडित महिला ही पिल्लई महाविद्यालयाच्या रस्त्याने जात असताना रिक्षाचालक विनयभंग केला. महिलेबरोबर गैरवर्तन करीत धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी रिक्षाचालक रोहित गोपाल गडे (वय 30) यास अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित महिला ही तिच्या मैत्रिणीसोबत पनवेल येथील पिल्लई महाविद्यालयाच्या रस्त्याने जात होती. यावेळी तिला तिथे रोहित गोपाल गडे याच्या रिक्षाचा धक्का लागला. धक्का लागला म्हणून सदर पीडित महिला हिने रिक्षाचालक रोहित गाडे याला जाब विचारला असता रिक्षाचालक रोहित गडे हा संतप्त होऊन त्याने पीडित महिलेसोबत गैरवर्तन केले. त्याने रिक्षामधून खाली उतरून पीडितेला जबरदस्तीने ओढले, तिच्या अंगावर हात ठेऊन अश्लील हावभाव केले व शिवीगाळ करत “तुला चाकूने मारेल” अशी धमकीही दिली.या प्रकारामुळे पीडित महिला प्रचंड घाबरली व तिने लगेचच खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे लगेचच गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले आणि धमकी दिली. त्यामुळे ती घाबरून गेली आणि तिने तात्काळ खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी रोहित गडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील फुटेजही तपासले जात आहेत.रोहित गडेचा याआधी गुन्हेगारी इतिहास आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांनी सांगितलं की, प्रकरण गंभीर स्वरूपाचं असून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल. खांदेश्वर पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74 (महिलेचा विनयभंग करण्यासाठी मारहाण किंवा शक्तीचा वापर) आणि कलम 75 (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, घटना गंभीर स्वरूपाची असून पीडितेच्या निवेदनानुसार आरोपीने केवळ अश्लील वर्तनच नाही केले, तर तिला शारीरिक इजा करण्याची धमकीही दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.