राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल, गाेसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे उघडले, वाचा धरणसाठ्याची अपडेट.

नाशिकमध्ये रामकुंड परिसरातील छोटे मोठे मंदिर पुन्हा पाण्याखाली गेले आहेत. राज्यात बहुतांश धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे .काही धरणांमधून विसर्ग सुरू झालाय. राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे .  धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पूर परिस्थितीत वाढ झाली आहे . गंगापूर धरणातून दुपारी बारा वाजता 3716 वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरीत सुरू झालाय . नाशिकमध्ये रामकुंड परिसरातील छोटे मोठे मंदिर पुन्हा पाण्याखाली गेले आहेत . दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पुराचे पाणी लागले आहे . दुसरीकडे आषाढी एकादशीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांमुळे उजनी धरणात होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आलाय .  राज्यात बहुतांश धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे .काही धरणांमधून विसर्ग सुरू झालाय .नदीच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे .

राज्यातील बहुतांश मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली . पुण्यात गेल्या वर्षी 15 टक्क्यांवर असलेला उपयुक्त जलसाठा यंदा 58.21 टक्क्यांवर आहे . नाशिकच्या ही बहुतांश धरण क्षेत्रांमध्ये चांगला पाऊस झाल्याने गेल्यावर्षी 17 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा यंदा 52.54 टक्क्यांवर आहे . मराठवाड्यातील ही बहुतांश धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे .रायगड जिल्ह्यातील 17 धरणं फुल्ल ! रायगड जिल्ह्यात रात्री मुसळधार पावसाने अलिबाग मुरुड रोहा नागोठणे परिसराला झोडपून काढले .त्यामुळे धरणांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे .जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 17 धरण 100 टक्के भरली असून रायगड जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे उन्नई धरण क्षमतेपेक्षा अधिक भरले आहे . धरणातून होणाऱ्या विसर्ग मुळे कुंडलिका नदी पातळीत मोठी वाढ झाली असून पाणी नदीपात्राच्या इशारा पातळीपर्यंत पोहोचले आहे .सध्या नदीची पाणीपातळी 23.10 मीटरवर पोहोचलीये .त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय .खबरदारीचा उपाय म्हणून कुंडलिका नदीवरील जुना पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे . खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला पुणे घाटमाथासह शहरात तसेच धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे .रात्रभर झालेल्या पावसामुळे रात्री बारापासून 6451 क्युसेक विसर्ग करण्यात आलाय .पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी जास्त केला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.