कन्नड तहसील कार्यालयासमोर मोठी घटना, नगरपालिकेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, थरारक व्हिडीओ समोर.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात एक मोठी दुर्घटना टळली. कन्नड नगरपालिकेची जुनी इमारत तहसील कार्यालयासमोर पत्त्यासारखी कोसळली. सुदैवाने दुकाने बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारतीचा भाग कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली, नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी धाव घेतली. इमारत कोसळल्याची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा असा आहे.कोणती घटनी कधी कशी घडून जाईल, याचा काहीच भरोसा नाही. त्यामुळे आपण नेहमीच काळजी घ्यायला हवी. सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतींकडे जाणं टाळणं आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला नको त्या अनपेक्षित संकटाला सामोरं जावं लागू शकतं. याआधी अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे या घटनांमधून आपण शिकलं पाहिजे. विशेष म्हणजे आज अशीच मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

कन्नड शहरात इमारत कोसळण्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीन कन्नड शहरात एक इमारत पत्त्यांसारखी कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे ही इमारत कन्नड नगरपालिकेची इमारत आहे. तसेच कन्नड तहसील कार्यालयाच्या अगदी समोर ही इमारत आहे.कन्नड तहसील कार्यालयाचं कामकाज आज नेहमीप्रमाणे सुरु होतं. या दरम्यान आज दुपारच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या अगदी समोर असलेली जुनी इमारत कोसळली . इमारत कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही इमारत कन्नड नगरपालिकेची होती. इमारतीच्या खाली दुकानं आहेत. इमारतीच्या तळमजल्याला अनेक गाळे आहेत. सुदैवाने इमारतीचा जो भाग खाली कोसळला त्या परिसरातील दुकानीच गाळे बंद होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.इमारत कोसळत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. इमारतीचा काही भाग पत्त्यांसारखा जमिनीवर कोसळतो. त्यामुळे परिसरात मोठी धूळ निर्माण होते. ही धूळ बाजूला झाल्यानंतर समोर पडलेली इमारत दिसते. यावेळी पोलीस आजूबाजूच्या दुकानात असलेल्या लोकांना बाहेर काढतात. अचानक अशाप्रकारची घटना घडल्यामुळे नागरीकदेखील भयभीत होतात. नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांकडून इमारत रिकामी करण्याचं काम करण्यात आलं. या दरम्यान परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली.या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत घटनेचा थरार अतिशय अचूकपणे कैद झाला आहे. सुदैवाने इमारत कोसळली त्या भागाची दुकानं बंद होती. पण त्याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर काही लोकं होतं. घटना घडत असताना पहिल्या मजल्यावरच्या काही जणांनी तातडीने जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. त्यामुळे ती बचावली. संबंधित इमारत धोकादायक होती का? आणि असेल तर मग तिथे दुकानं कशी सुरु होती? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.