शुभमन आणि पंतने इंग्लंडविरुद्ध केली विशेष रणनीती; धावा काढण्यासाठी कसा केला प्लॅन?

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी चांगली फलंदाजी केली. या सामन्यातील कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यातील संवादाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी चांगली फलंदाजी केली. कर्णधार गिलने शतक झळकावले आहे, तर जयस्वालने अर्धशतक झळकावले आहे. या खेळाडूंमुळेच टीम इंडिया पहिल्या दिवशी 310 धावा करू शकली. या सामन्यातील कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यातील संवादाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.ऋषभ पंत म्हणाला की, “चेंडू खूप सॉफ्ट झाला आहे. तो अजिबात पुढे जात नाही.

यावर कर्णधार शुभमन गिल म्हणतो की तो सध्या येथे धावा घेणार नाही. मग पंत म्हणतो की तो कॉलवर पाहेल. आधीच काहीही ठरवू नका. कॉल देऊ आधी. आता या दोघांमधील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पहिल्या दिवसानंतर शुभमन गिल अजूनही 114 धावांसह क्रीजवर आहे. रवींद्र जडेजा त्याला चांगली साथ देत आहे आणि 41 धावांसह क्रीजवर आहे. यापूर्वी यशस्वी जयस्वालने 87 धावा केल्या होत्या. करुण नायरने 31 धावांचे योगदान दिले होते. तर उपकर्णधार ऋषभ पंत मोठी खेळी करू शकला नाही आणि 25 धावा काढून बाद झाला. केएल राहुलही 2 धावा काढून बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाने 5 गडी गमावून 310 धावा केल्या आहेत.

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने दोन विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय ब्रायडन कार्सने एक विकेट घेतली. बेन स्टोक्स आणि शोएब बशीर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताच्या संघात तीन मोठे बदल पाहायला मिळाले. संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन, शार्दुल ठाकुरला संघात सामील केले नाही. नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाश दीपला संघात संधी मिळाली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.