किरकोळ वादातून तरूणाला लोखंडी रॉडने मारहाण

किरकोळ वादातून तरूणाला लोखंडी रॉडने मारहाण

 जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत राहणाऱ्या एका तरूणाला दोन जणांकडून शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली आहे.याप्रकरणी शनिवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अजीत वसंतलाल वलभानी वय ३८ रा. सिंधी कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता अजित याने घराच्या परिसरात राहणारा यश रामचंद्राणी याला बोलावून म्हणाला की, तू आपल्या परिसरातील लोकांना जुआ, पत्ता खेळण्याच्या सवय का लावतो असे सांगितले. याचा राग आल्याने यश रामचंद्राणी आणि त्यांच्या सोबत असलेला यश अग्रवाल या दोघांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले. यात अजीत याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी शनिवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता अजित वलभानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यश रामचंद्राणी आणि यश अग्रवाल दोन्ही रा. सिंधी कॉलनी, जळगाव या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे करीत आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.