निवृत्त सहाय्यक फैाजदाराला मुलाकडे जाणं पडलं महागात! बंद घर फोडून चोरट्यांनी रोकडसह लांबविले दागिने

निवृत्त सहाय्यक फैाजदाराला मुलाकडे जाणं पडलं महागात! बंद घर फोडून चोरट्यांनी रोकडसह लांबविले दागिने

पत्नीसह रावेर येथे मुलाकडे गेलेले सेवानिवृत्त सहायक फौजदार चंद्रकांत माधवराव बडगुजर (वय ६७, रा. दादावाडी, जळगाव) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख सात हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.याप्रकरणी येथील तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार चंद्रकांत बडगुजर पत्नीसह गेल्या १४ सप्टेंबरला रावेर येथे शिक्षक असलेल्या मुलाकडे (पंकज बडगुजर) गेलेले होते. मात्र, जळगाव येथील त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून रोख सात हजार रुपये, ३० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोनपोत, १० हजार रुपये किमतीच्या गणपतीची चांदीच्या दोन मूर्ती, चांदीचे लक्ष्मीचे शिक्के, जोडवे असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

शेजारी राहणाऱ्या महिलेने गुरुवारी (ता.२६) बडगुजर यांच्याशी संपर्क साधून दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. त्यानंतर बडगुजर कुटुंबीय घरी आले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटून ते जिन्याखाली पडलेले दिसले.तसेच घरामधील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते, तर कपाटात ठेवलेली रोकड व सोने-चांदीचे दागिने दिसले नाहीत. याप्रकरणी त्यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबातबचा पुढील तपास पोलिस नाईक धनराज पाटील करीत आहेत.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.