काय डोकं आहे ! आई अभ्यासावरून रागवली, शाळकरी मुलीने रचला अपहरण, लैंगिक अत्याचाराचा बनाव

काय डोकं आहे ! आई अभ्यासावरून रागवली, शाळकरी मुलीने रचला अपहरण, लैंगिक अत्याचाराचा बनाव

गेल्या काही काळात मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहे. बदालपूरमधील शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराने तर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. त्या घटनेतील आरोपीचा एन्काऊंटरमध्ये मृत्यूही झाला. लैंगिक अत्याचाराच्या घटनांविरोधात आवाज उठवत नागरिक कडक कायद्यांची मागणी करत आहेत. हे सगळं सुरू असताना दुसरीकडे मुंबईतील भांडूपमध्ये एक अतिशय भयानक आणि तेवढीच धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले. एका शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसांसमोर आली होती. मात्र घटनाक्रम आणि पुरावे यात तफावत आढळल्याने पोलिसांना संशय आला, अखेर त्यांनी कसून तपास करताच हा सगळा बनाव असल्याचे समोर आले. आई अभ्यासावरून रागावली म्हणून त्या अल्पवयीन मुलीने स्वत:च्याच अपहरणाचा आणि लैंगिक अत्याचाराच बनाव रचल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. यामुळे परिसरात खळबळ माजली असून पोलिसही अवाक् झाले. शाळा सुटली तरी घरी आलीच नाही म्हणून…. मिळालेल्या माहिनीनुसार, ही अल्पवयीन मुलगी भांडूप येथे तिच्या आई-वडिलांसह राहते. शनिवारी सकाळी ती पावणेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली. दुपारी शाळा सुटून बराच वेळ झाला तरी ती घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबियांना चिंता वाटू लागली, ते काळजीत पडले, सगळीकडे तिचा शोध घेऊन लागले. मात्र मुलगी काही सापडलीच नाही. अखेर संध्याकाळी 4-5 च्या सुमारासा ती मुलगी घरी आली, ते पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला.

स्वत:च्याच अपहरणाचा बनाव घरी परतव्यावर कुटुंबियांनी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. इतका वेळ कुठे होतीस, घरी यायला आज इतका वेळ का लागला, नेमकं काय झालं असे प्रश्न विचारत घरच्यांनी तिला भंडावून सोडलं. तेव्हा तिने जे सांगितलं ते ऐकून घरचे सगळे हादरलेच. त्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, शाळेत जात असताना तीन जणांनी अचानक तिला गाठलं, तिच्या तोंडाला रुमाला बांधला आणि तिला ठाण्याच्या दिशेने नेलं. तेथे त्यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती त्या मुलीने तिच्या आईला दिली. हे ऐकून घरच्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीच्या आईन तातडीने भांडूप पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार कथन केला. पोलिसांनी तत्काळ तक्रार नोंदवून घेत याप्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र तिने सांगितलेला घटनाक्रम आणि पुरावे यात तफावत आढळली. पोलिसांनी त्या मुलीच्या शाळेच्या बाहेरच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटजेही चेक केलं. तेव्हा ती मुलगी तेथे एकटीच चालत असल्याचं दिसून आलं. त्यावरून पोलिसांना संशय आला. अखेर पोलिसांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने जे सांगितलं ते ऐकून सगळेच चक्रावले. आई अभ्यासावरून रागावली, म्हणून आपण हा अपहरणाचा आणि लैंगिक अत्याचाराचा बनाव रचल्याचे तिने पोलिसांसमोर कबूल केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.