वर्षभरापूर्वी भाजपविरोधात उठवलं रान; आता त्याच भाजपमध्ये मिळणार मानाचं पान?

काँग्रेसचे दोन वेळा आमदार राहिलेले, माजी मंत्र्यांचे चिरंजीव आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय कुणाल पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. धुळे ग्रामीणचे आमदार राहिलेल्या पाटील यांच्या कुटुंबाचा काँग्रेसशी प्रदीर्घ संबंध होता.मुंबई: काँग्रेसचे दोन टर्मचे आमदार, माजी मंत्र्यांचे चिरंजीव आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय कुणाल पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. ते धुळे ग्रामीणचे आमदार राहिले आहेत. पाटील यांचं कुटुंब प्रदिर्घकाळ काँग्रेससोबत राहिलं आहे. जवळपास ७० वर्षे त्यांचं कुटुंब काँग्रेससोबत राहिलं. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा पराभव झाला.
कुणाल पाटील यांच्या प्रवेशानं धुळ्यात भाजपची ताकद वाढली आहे. दोन टर्मचे आमदार राहिलेल्या कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील तब्बल सात वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी मंत्रिपदही भूषवलेलं आहे. आता दूरदृष्टी ठेवून भाजपसोबत जात असल्याचं कुणाल पाटील यांनी सांगितलं. काँग्रेससोबत ७० वर्षे एकनिष्ठ राहिलं. त्यामुळे आता दुसऱ्या पक्षात जाणं अवघड असल्याच्या भावना त्यांनी बोलून दाखवल्या.२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप ला महाराष्ट्राला जबर धक्का बसला.

२०१९ मध्ये २३ जागा जिंकणारा भाजप अवघ्या ९ जागांवर आला. काँग्रेसनं १ वरुन १३ जागांवर झेप घेतली. काँग्रेसच्या यशात काँग्रेसच्या जिल्हा पातळीवरील नेतृत्त्वाचा मोठा वाटा होता. काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हा पातळीवर प्रभारी म्हणून काम करत मतदारसंघांची जबाबादारी घेतली आणि १३ जागा जिंकून आणत भाजपचे तीन तेरा वाजवले.धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपनं माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंना संधी दिली. दोन टर्मचे खासदार असलेल्या भामरेंसमोर काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचं आव्हान होतं. धुळे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भामरेंनी आघाडी घेतली. पण एकट्या मालेगाव मध्य मतदारसंघात घेतलेल्या आघाडीमुळे बच्छाव यांनी बाजी मारली. त्या केवळ ३ हजार ८३१ मतांनी विजयी झाल्या. त्या निवडणुकीत धुळे मतदारसंघाची जबाबदारी कुणाल पाटील यांच्याकडे होती.लोकसभेत मोठा धक्का बसल्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रान उठवलं. राज्यात व्होट जिहादचा झाल्याचा आरोप त्यांनी केला. व्होट जिहादमुळे महाविकास आघाडीला यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

अनेक सभांमध्ये त्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाचा दाखला दिला. तिथली आकडेवारी दिली. सुभाष भामरे पाच मतदारसंघांमध्ये आघाडीवर होते. पण मुस्लिमबहुल मालेगाव मध्य मतदारसंघात ते पिछाडीवर पडले. या मतदारसंघानं बच्छाव यांच्या बाजूनं एकगठ्ठा मतदान केलं. त्यामुळे भामरे पराभूत झाल्याचं फडणवीस यांनी राज्यभरातील अनेक सभांमध्ये सांगितलं होतं.भाजपच्या दोन टर्मच्या खासदाराला, माजी मंत्र्याला पराभूत करण्यात कुणाल पाटील यांनी मोलाची कामगिरी पार पाडली होती. आता त्याच पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. कुणाल पाटील यांचा गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या रघुवेंद्र पाटील यांनी ६६ हजार मतांनी पराभव केला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.