अरे प्रदीप थांब वहिनीला मारू नकोस…! मध्यस्थी करणाऱ्या भावासह वडिलांवरच फिरला, पण शेवट अत्यंत भयंकर.

चंद्रपूर जिल्ह्यातील हरदोना येथे एका कुटुंबात शोकांतिका घडली. पत्नीला मारहाण करणाऱ्या लहान भावाला थांबवण्यासाठी गेलेल्या वडील आणि मोठ्या भावावर त्याने हल्ला केला. संतप्त झालेल्या मोठ्या भावाने गळा दाबून त्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी वडील आणि मोठ्या भावाला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.लहान भावाचे पत्नी सोबत भांडण झाले.पत्नीला मारहाण करीत असलेल्या लहान भावाला अडविण्यासाठी वडील आणि मोठा भाऊ धावून गेला. मात्र लहान भावाने त्यांच्यावरच काठीने हल्ला केला.

रागाचा भरात वडिलांनी त्याचे दोरीने हात बांधले. मोठ्या भावाने त्याचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली आहे. प्रदीप मनोहर चीलमुले असे मृतकाचे नाव आहे. मनोहर बक्का चिलमुले (५०), प्रफुल मनोहर चिलमुले (२८) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर जिल्हातील कोरपणा तालुक्यात येणाऱ्या हरदोना (बु.) येथील मनोहर बक्का चीलमुले यांना तीन मुले आहेत. २८ जूनला रात्री नऊ वाजताच्या दरम्यान मृतक प्रदीप हा आपल्या पत्नीसोबत भांडण करून तिला मारहाण करीत होता. त्याचा मोठा भाऊ प्रफुल चिलमुले हा त्याचे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करायला गेला. यामुळे प्रदीप भडकला. त्याने काठी उचलली आणि त्याला मारहाण करू लागला.दोन मुलांना भांडताना बघून वडील मनोहर चिलमुले धावून गेलेत. मात्र प्रदीप चिलमुले हा त्या दोघांनाही ऐकत नव्हता. शेवटी प्रफुलने त्याला खाली पाडले. वडिलांनी घरातील दोरी आणली. त्याचे हात बांधले. रागाचा भरात प्रफुलने प्रदीपचा गळा दाबला. यामुळे प्रदीप बेशुद्ध पडला. त्याला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी वडील आणि मोठ्या भावाला अटक केली आहे. राजुरा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ३०५/२०२५ कलम १०३(१),३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते करित आहे.दरम्यान, या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. रागाच्या भरात केलेले कृत्या लहान भावाच्या जीवावर बेतले. कारण जर त्याने शांतपणे भांडणे थांबवली असतीत तर आ प्रदीप जिवंत असला असता. रागाच्या भरात प्रदीपने वडील किंवा मोठा भाऊ म्हणजेच प्रफुलवरही हल्ला चढवला असता तर त्यांच्याही जिवाला धोका झाला असता.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.