हॉर्न वाजविण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा, माजी नगरसेवकाच्या दोन्ही मुलांना दुखापत; सोलापुरात तणाव.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या धुसफुसीचे पर्यवसान हे भरधाव बाईक चालवून जोरात हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून दगडफेकीत झाले. सोलापूर शहरातील घोंगडे वस्तीत रात्री दहानंतर सुमारे अर्धा तास दोन गटामध्ये तुफान दगडफेक झाली. यात माजी नगरसेवकाची दोन मुले जखमी झाली आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या धुसफुसीचे पर्यवसान हे भरधाव बाईक चालवून जोरात हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून दगडफेकीत झाले. सोलापूर शहरातील घोंगडे वस्तीत रात्री दहानंतर सुमारे अर्धा तास दोन गटामध्ये तुफान दगडफेक झाली. रस्त्यावरील अनेक वाहनं आडवी करण्यात आली. गल्लीमध्ये दगडांचा खच पडला. या दगडफेकीत माजी नगरसेवक सुरेश पाटील यांची दोन मुले बिपीन आणि संदीप हे जखमी झाले आहेत. दुसऱ्या गटातील रियाज नदाफ (वय २१, रा. घोंगडे वस्ती) याच्यासह चार युवक युवकही जखमी झाले आहेत.

सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती परिसरात ही घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत घोंगडे वस्ती परिसरातील रहिवासी रऊफ इनामदार आणि त्याचा मित्र हे गाडीवरून जात होते. यावेळी रऊफने गाडीचा हॉर्न वाजवत समोरच्यांना रस्ता सोडण्याची मागणी केली. त्यावेळी जोरात हॉर्न का वाजवतो? यावरून भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचा मुलगा बिपीन पाटील आणि रऊफमध्ये बाचाबाची झाली. पाटील यांच्या घरासमोर कार लागली होती. कारच्या मागून बाईक चालविणाऱ्या रियाजने जोरात हॉर्न मारला. त्यामुळे तेथे थांबलेल्या दोघा तिघांना संताप अनावर झाला.रियाज आणि भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलात बाचाबाची होत वाद सुरू झाले. एकाने त्याला जाऊ दे बे’ असे म्हणताच ‘अरे बे कोणाला म्हणतो’ असा रियाजने जाब विचारला अन् वादविवादास सुरुवात झाली. त्यानंतर रियाजने नातेवाईकांना मोबाईल करून बोलावून घेतलं, त्याची माणसं आल्यानंतर तणाव निर्माण झाला. तोपर्यंत पाटील यांच्या घरासमोरही गर्दी वाढली अन् दोन गटांमध्ये दगडफेकीला सुरुवात झाली. अचानक ही घटना सुरू झाल्याने काय घडतंय हे अनेकांना कळण्याच्या आत पाच ते सहा दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले. तेथे असलेल्या एका रिक्षाचे थोडेफार नुकसान झाले.दगडफेकीत भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांची दोन मुले बिपीन आणि संदीपच्या डोक्याला दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. दुसऱ्या गटातील सैफन सुलेमान पठाण (वय ५४), रशिदा पठाण, रऊफ इनामदार (वय २२), अफान शेख यांच्याही पायाला आणि हाताला जखम झाली. रियाज, सैफन, रशिदा, रऊफ आणि अफान यांना रात्री उशिरा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार सिजान कादीर मुल्ला, अदनान कादीर मुल्ला,अकीब सतार मुल्ला, इरफान इनामदार, युसुफ इनामदार, बादशाह इनामदार,इब्राहीम ऊर्फ इब्या इनामदार अमिर इनामदार, बाबा निसार शेख,अज्जु शेख, शाहीद शेख,सोहेल शेख, अरबाज मुलानी व इतर १० ते १५ लोक. सर्व रा. सोलापूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.