भडगाव तहसीलदार यांना धनगर समाजाच्यावतीने निवेदन.

भडगाव तहसीलदार यांना धनगर समाजाच्यावतीने निवेदन

भडगाव तालुका प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : शहरातील धनगर समाज बांधवातर्फे धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी तहसील कार्यालय समोर येळकोट येळकोट जय मल्हार यासह विविध घोषणा देत धरणे आंदोलन करण्यात आले. व तहसीलदार शितल सोलाट यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात धनगर जमातीची ७० वर्षापासून घटनेमध्ये असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणीची मागणी आहे. भारत सरकारच्या दरवर्षी प्रसिध्द होणाऱ्या राजपत्रात अनुसूचित जमातीच्या यादीत अ.क्र. ३६ वर धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे. गेल्या ७० वर्षापासून धनगर जमात आपल्या संवैधानिक हक्कापासून वंचित आहे.

महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून धनगर जमातीस अनुसूचित जमातीचे दाखले त्वरीत द्यावेत या मागणीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे. सदर मागणीसाठी पंढरपूर, लातूर, नेवासा येथे गेल्या १४ दिवसांपासून धनगर समाज बांधव आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्या उपोषणाकत्यांची शासनाने त्वरीत दखल घेऊन धनगर जमातीच्या अनु. जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी या विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी करण्यात यावी व तात्काळ एस. टी. प्रमाणपत्र देण्यात यावे. अन्यथा भडगाव तालुका सकल धनगर समाज तर्फे उपोषणाचा इशारा देण्यात आला. यावेळी निवेदन देताना मल्हारसेना जिल्हा अध्यक्ष संदिप मनोरे, डॉ. गणेश अहिरे, मल्हारसेना तालुका अध्यक्ष वाल्मीक कंखरे, मल्हारसेना संपर्क प्रमुख आकाश कंखरे, मल्हारसेना शहर अध्यक्ष निलेश धनगर, उत्तम धनगर, भगवान धनगर, ईश्वर कंखरे, अरुण कंखरे, नाना धनगर, श्याम मुसांडे, भाऊसाहेब मोटे, अनिल धनगर, मनोज धनगर, यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.