बीड जिल्ह्यात भीषण अपघात; भरधाव वेगातील कारच्या धडकेत युवक ठार, 2 जखमी.

बीड जिल्ह्यातील केज-अंबाजोगाई रोडवरल भरधाव वेगातील कारने मुलाला धडक दिल्यानंतर ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली.राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण गेल्या काही महिन्यांत वाढल्याचं पाहायला मिळत असून विविध अपघातात अनेक ठिकाणी प्रवाशांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. बीड जिल्ह्यातही अपघाताच्या अनेक घटना घडल्या असून आज पुन्हा एकदा भीषण अपघाताची  घटना घडली. केज-अंबाजोगाई रोडवर भरधाव वेगातील कारने एका पायी जाणाऱ्या मुलाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघाताची घटना घडल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. तसेच, घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनाही  देण्यात आली.

दरम्यान, अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातील केज-अंबाजोगाई रोडवरल भरधाव वेगातील कारने मुलाला धडक दिल्यानंतर ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. त्यामध्ये, पायी चालणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला असून कारमधील दोघेजण देखील जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. गेल्या काही दिवसात अंबाजोगाई रोडवर अपघाताच्या घटना वाढल्या असून या मागील कारण शोधणं व उपाय करणे गरजेचं आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगावच्या जायकोचीवाडी येथील रस्त्यासाठी खामगाव पंढरपूर महामार्गावर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आल. गेल्या 35 वर्षांपासून जायकोचीवाडी ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल होत असून याचा त्रास गावातील गर्भवती महिला, शाळेतील विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. त्याच बरोबर पुरूषोत्तमपुरी रस्त्यात आलेले अतिक्रमण काढण्यात यावे, जायकोची वाडी फाट्यावर थांबा देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी आझाद क्रांती सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.