गपूरहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये खळबळ.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. यावेळी घाबरलेल्या प्रवाशांनी तत्काळ रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता काही वेळाने आरपीएफ जवान रेल्वेच्या कोच मध्ये हजर झाले.ट्रेन नंबर 22691 या राजधानी एक्सप्रेसवर काही अज्ञातांनी काल रात्री(20 जून) दगडफेक केली. दिल्लीकडे रवाना झालेल्या या ट्रेनवर हबीबगंजजवळ दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. यावेळी घाबरलेल्या प्रवाशांनी तत्काळ रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता काही वेळाने आरपीएफ जवान रेल्वेच्या कोच मध्ये हजर झाले. त्यांनी रेल्वेच्या डब्यांची पाहणी केली आणि नुकसान झालेल्या डब्यांच्या काचांची दुरुस्ती करून गाडीला हिरवा कंदील दाखवला. या सगळ्या गदारोळात नागपूरहून दिल्लीकरिता वेळेत निघालेली राजधानी एक्सप्रेस तब्बल दोन तास रखडली.मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन नंबर 22691 ही नागपूरहून सुटणारी राजधानी एक्स्प्रेस तिच्या वेळापत्रकानुसार दिल्लीकरिता रवाना झाली.

रात्रीची वेळ असल्याने प्रवासी त्यांचे जेवण करत होते. दरम्यान, हबीबगंज परिसरातून जात असताना काही अज्ञातांनी ट्रेनवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. याचवेळेस एका कोच मध्ये काच फुटून दगड थेट प्रवाशांच्या जेवणाच्या ताटात पडला.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ट्रेनच्या कोचमध्ये आरडाओरड सुरू झाली. परंतु काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखून रेल्वे ॲपच्या सहाय्याने रेल्वे प्रशासनाकडे मदतीसाठी विनंती पाठवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आरपीएफ जवांनाना पाचारण केले. काही वेळातच अरपीफच्या जवानांनी रेल्वेचा ताबा घेतला. आणि नुकसान झल्येल्या कोचची पाहणी केली. ज्या कोचच्या काच फुटल्या होत्या त्या दुरुस्त करण्यात आल्या.

सर्व पाहणी केल्यानंतर आणि खात्री करून ट्रेनला पुन्हा राजधानी दि दिशेने रवाना करण्यात आले.काहि समाजकंटक जाणून बूजून अशा घटना घडवत असतात. त्यांच्या अशा घातपाती कारवायांमुळे निष्पाप प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. अशा समाजकंटकांना पकडुन त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जाते. ट्रेनवर दगडफेक करण्याचा हा प्रकार फार पूर्वीपासून होत आहे. विशेषतः लांबपल्ल्याच्या गाडीमधून प्रवास करताना प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे अशा घटनांना आळा बसला पाहिजे आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी प्रवाशांची मागणी जोर धरू लागली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.