वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेडहून धावणार, असाच प्रयोग जनशताब्दी बाबत करा;अंबादास दानवे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवांकडे मागणी.

छत्रपती संभाजीनगर-वंदे भारत रेल्वे नांदेडपर्यंत पुढे नेली  असाच प्रयोग जनशताब्दी बाबत करावा. अशी मागणी अंबादास दानवे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवांकडे केली आहे.नांदेडकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जालना ते मुंबई रेल्वेने प्रवास करणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेडहून धावणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सोबतच ही गाडी आता नांदेड-मुंबई एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणार असून या गाडीला परभणी रेल्वे स्थानकातही थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाश्यांना ही रेल्वेसेवा सोयीची ठरणार आहे. साहजिकजच या नव्या निर्णयामुळे गाडीच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. ही गाडी छत्रपती संभाजीनगरहून सकाळी सव्वाआठ वाजता मुंबईच्या दिशेने निघेल.दरम्यान, याचं मुद्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी छत्रपती संभाजीनगर-वंदे भारत रेल्वे नांदेडपर्यंत पुढे नेली  असाच प्रयोग जनशताब्दी बाबत करावा.

परिणामी संभाजीनगरच्या प्रवाश्यांसाठीचा तिकीट कोटा खूप कमी झाला आहे. गाड्यांमध्ये गर्दी, असुरक्षित प्रवास वाढला तो वेगळा. उलट नांदेड-मुंबई अशी स्वतंत्र वंदे भारत सुरू करून देणे सर्वांच्याच हिताचे ठरेल. अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्याकडे केली आहे. त्यांनी आपल्या एक्स या समाज माध्यमावर पोस्ट शेयर करत ही मागणी केली आहे. महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यांनाही जोडणार वंदे भारत! स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ परभणी – पहाटे 5.40 वाजता/ पहाटे 5. 42 वाजता , जालना – सकाळी 7.20 वाजता / सकाळी 7.22  वाजता , छत्रपती संभाजीनगर- सकाळी ८.१३ वाजता / पहाटे ८.१५ वाजता , अंकाई – सकाळी ९.४० वाजता , मनमाड – सकाळी ९.५८ वाजता / सकाळी १०.०३ वाजता , नाशिक रोड – सकाळी ११ वाजता / सकाळी ११.०२ वाजता कल्याण -दुपारी १ वाजून २० मिनिटे/ दुपारी १.२२ वाजता , ठाणे – दुपारी १.४०वाजता/ दुपारी १.४२ वाजता , दादर – दुपारी २.१० वाजता / दुपारी २.१० वाजता , आणि सीएसएमटी येथे दुपारी दोन वाजून २५ मिनिटांनी पोचेल.स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ दादर – दुपारी १.१७ वाजता / दुपारी १.१९ वाजता ,ठाणे -दुपारी १.४० वाजता / दुपारी १.४२ वाजता कल्याण – दुपारी २.४ वाजता / दुपारी २.०६ वाजता, नाशिक रोड – दुपारी ४.१८वाजता / दुपारी ४.२०, मनमाड – सायंकाळी ५.१८ वाजता / सायंकाळी ५.२० वाजता अंकाई – सायंकाळी ५.५० वाजता / सायंकाळी ५.५२ वाजता ,  छत्रपती संभाजीनगर – सायंकाळी ७.५ वाजता / सायंकाळी ७.१० वाजता जालना – रात्री ८.०५ वाजता / ५.०७ वाजता परभणी – रात्री ९.४३ वाजता / रात्री ९.४५ वाजता नांदेड येथे रात्री दहा वाजून ५० मिनिटांनी पोहचेल. रेल्वेत आठ एसी सेकंड क्लास सीटर कोच उपलब्ध रहणार आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.