देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे विद्यार्थ्यांना गोड पदार्थ बासुंदी वाटप .

देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे विद्यार्थ्यांना गोड पदार्थ बासुंदी वाटप .

भुसावळ प्रतिनिधी – युवराज कुरकुरे पोषण आहार अभियान आवाहनाला प्रतिसाद देत माझ्या शाळेत बासुंदी वाटप राबवला उपक्रम: संचालक चंद्रकांत पाटील यांचे मत. डी एस देशमुख माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण येथे संस्थेचे संचालक , प्रगतीशील शेतकरी व डेअरी फर्म संचालक चंद्रकांत सुराजी पाटील यांनी 80 लिटर दुध , ड्रायफुड सह बनवलेली बासुंदी त्यांचे शुभहस्ते विद्यार्थ्यांना वाटप केली . संस्थे तर्फे दाते चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला . मध्यांन भोजन वेळी हा कार्यक्रम संपन्न झाला . सप्टेंबर महिन्यातील गोड पोषणमूल्य आहार देण्यासाठी मिनाक्षी चंद्रकांत पाटील , चंद्रकांत सूराजी पाटील यांनी मानस ठेवला होता व दायित्व पूर्ण केले .
संचालक मधुकर कोल्हे यांनी नियोजन सहकार्य केले .

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, सामाजिक प्रतिनिधी जळगांव राजेंद्र शिंदे , गावचे पोलिस पाटील अरविंद झोपे, संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, सचिव पवन चौधरी, संचालक प्रकाश बाऊस्कर , मधुकर कोल्हे, नंदकुमार चौधरी, रविंद्र चौधरी, दिनेश पाटील , ग्रामपंचायत सदस्या हेमलता बाऊस्कर, रमेश बाऊस्कर उपस्थित होते . विद्यालयातील 5 वी ते12 वी सर्व विद्यार्थी जि.प शाळा सर्व विद्यार्थी यांनी लाभ घेतला . त्यांच्या या दातृत्वा बद्दल पालक वर्गातून कौतुक केले जात आहे . सर्व शिक्षक बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . सांस्कृतिक समिती प्रमुख पी सी कचरे यांनी सुत्रसंचालन केले उपप्रमुख जयश्री चौधरी यांनी आभार मानले .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.