केराहळे ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई व्हावी मनसे

केराहळे ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई व्हावी मनसे

रावेर तालुक्यातील केराळे ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी एस टि पाटील हे आहेत केराळे गावातील नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रारी करून सुद्धा त्यावर कोणतेही उपायोजना करताना ग्रामसेवक दिसत नाही व त्यांच्या त्रास सर्व ग्रामस्थांना सहन करावा लागत आहेत रावेर मध्ये ग्रामसेवक सरकारी कामापेक्षा खाजगी कामातच दंग असल्याने ग्रामस्थांना विविध कामांसाठी खोडबुन राहावे लागत असल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे एस टि पाटील हे ग्रामसेवक असून त्याच्या अनेक वेळेला मनमानी कारभार समोर आलेला आहे तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम 1958 प्रमाणे पंचायतीचे सचिव म्हणून ग्रामसेवक हे कार्य पार पाडत असतात पण या किराडे गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामसेवक कोणतेही आपले कर्तव्य पार पाडताना दिसत नसून .

एस टि पाटील ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांनी शिस्तभंग केला आहे तरी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम १९५४ च्या नियम चार नुसार ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी व त्यांना दुसऱ्या गावात तात्काळ बदली करण्यात यावी व केराळे ग्रामपंचायत मध्ये चांगले विकास कामांना व गावाचे निर्णय घेण्याच्या दृष्टीने ग्रामविकास अधिकारी यांना तात्काळ बदली म्हणून पाठवावे व एस टि पाटील यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे आम्ही करत आहोत तसे न झाल्यास आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून २ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती रोजी जन आंदोलन किंवा आमरण उपोषण करू याची आपण नोंद घ्यावी व त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडल्यास आपले पंचायत समिती कार्यालय रावेर हे जबाबदार राहील याची सुद्धा नोंद घेण्यात यावी ही आपणास नम्र विनंती हे निवेदन राज्य उपाध्यक्ष जनहित विध विभाग चेतन आढळकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले उपस्थित विनीत महाजन विद्यार्थी सेना तालुका सचिव रितेश महाजन विद्यार्थी सेना उप तालुका अध्यक्ष राहुल महाजन गोपाळ महाजन नंदू महाजन गणेश महाजन अमोल चौधरी महेंद्र महाजन राहुल महाजन शुभम महाजन व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.