बाभुळगाव येथील शेत रस्त्याच्या प्रश्न ऐरणीवर पूर्ण पावसाळ्याचे चार महिने शेतात बैलगाडीच जाईना. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट व दयनीय

बाभुळगाव येथील शेत रस्त्याच्या प्रश्न ऐरणीवर पूर्ण पावसाळ्याचे चार महिने शेतात बैलगाडीच जाईना. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट व दयनीय

धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर, धरणगाव : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून गेल्या तीन महिन्यापासून संपूर्ण तालुक्यात सतत धार पाऊस मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पावसाळा हा शेतीचे काम करण्यासाठी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. बाभुळगाव गिरणा नदीच्या काठावर वसलेले असून पाण्याच्या बाबतीत सुजालाम सुफलाम आहे. शेती पण येथे उत्कृष्ट प्रकारची आहे. परंतु बाभुळगाव येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी एकही शेत रस्ता चांगला नाही. बाभुळगाव येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तीन ते चार मुख्य रस्ते आहेत त्याच्या एक बाभुळगाव ते उखळवाडी, बाभुळगाव ते भामर्डी, बाभुळगाव ते जामोद, व बोरंमई रस्ता, असे 4 मुख्य रस्ते आहेत. या मुख्य रस्त्यांच्या प्रश्न सुटल्यास बाभुळगाव येथील शेतकऱ्यांच्या रस्त्याचां प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. स्वातंत्र्य काळापासून गेल्या 40,ते 50 वर्षात या पैकी एकही शेत रस्ता आज पर्यंत झालेला नाही. शेतात जाण्यासाठी रस्त्याच नसल्याने शेतकऱ्यांना प्रचंड भयंकर अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस हे शेतीचे अंतर्मशक्तीचे कामे करण्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. परंतु येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत अडचणींचा सामना हा करावा लागत आहे. शेतात जाणारे सर्व रस्ते अत्यंत चिखलमय झाल्यामुळे शेतात जायचे कसे असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे. आता शेतात बैलगाडी जाणे तर दूरच आहे परंतु अक्षरशः पायी चालणे देखील अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत शेती करायची कशी असा प्रश्न बाभूळगाव येथील शेतकऱ्यांना पडलेला आहे. शेतात कापूस, उडीद ,मुंग ,सोयाबीन मका ,ज्वारी, इ. महत्वाची पिके शेतात पेरली आहेत.

या पिकांना खत देण्यासाठी फवारणी करण्यासाठी आंतरमशागती ची कामे करण्यासाठी शेतीचे साहित्य नेण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना हा करावा लागत आहे. परिणामी शेतातील पिकांना अंतर मशागतीची कामे वेळेवर होत असल्यामुळे शेतीचे उत्पन्न बुडालेले आहे अशा परिस्थितीत डोक्यावर बँकांचे सावकारांची कर्ज उधारीवर घेतलेले बी बियाणे ,औषधी, खते इत्यादींच्या खर्च व परिवाराच्या उदरनिर्वाह करायच्या कसा असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर येऊन ठेपलेला आहे. काही शेतकऱ्यांचे शेतात बैलगाडी अजूनही अडकून पडलेले आहेत एवढी भयंकर परिस्थिती या शेत रस्त्यांची झालेली आहे अजून किती दिवस शेतकऱ्यांच्या असे हाल अपेक्षा सोसावे लागणार आहेत. एकीकडे शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या उपाययोजनांच्या मोठा गाजावाजा हा सुरू असताना दुसरीकडे बाभुळगाव येथील शेतकऱ्यांचे बिकट व दयनीय अवस्था हे चित्र अत्यंत विचित्र आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पाहिजे त्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत याचे जिवंत उदाहरण हे बाभुळगाव येथील शेतकऱ्यांचे आहे. आतापर्यंत बाभुळगाव येथील शेतकऱ्यांवरती लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासनांचा पाऊस पडलेला आहे. परंतु आता लोकप्रतिनिधींनी या विषयात लक्ष घालून शेतकऱ्यांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवाव्या अशी मागणी बाभुळगाव येथील शेतकऱ्यांन कडून केली जात आहे. आता सध्या सर्व जनतेचे लक्ष हे निवडणूकिंकडे लागलेले आहे . प्रत्येक पक्ष जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्याचे सोयीनुसार आपला प्रचार हा करत आहे आपलाच पक्ष श्रेष्ठ असा हा सर्वोच्च पक्षांकडून प्रचार हा केले जात आहे परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या समस्यांकडे व शेतकऱ्यांकडे कोणताही पक्षाचे लक्ष नसून हीच वास्तविकता आहे आता तरी लोकप्रतिनिधींनी जागे होऊन बाभुळगाव येथे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा सर्व शेतकरी बांधवांनी व्यक्त केलेली आहे. शेत रस्त्यांच्या प्रश्न न सुटल्यास आगामी निवडणुका मध्ये त्याचे परिणाम दाखवून देऊ असा थेट इशाराच येथील शेतकरी बांधवांनी दिलेला आहे. प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे लक्ष देऊन क्षेत्र रस्त्यांवर मुरूम टाकून शेतकऱ्यांच्या प्रश्न कायम स्वरुपी सोडवावा अशी अपेक्षा बाभुळगाव येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.