मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराज व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या एका मुलाखतीवरून महायुतीतील धुसफूस समोर आली आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) संवादात चांगले नाहीत असे वक्तव्य केले होते. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी नाराज व्यक्त केली आहे. संवादासंदर्भातील गोष्टी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चार भिंतीच्या आतही बोलू शकले असते, असं मिटकरी म्हणाले आहेत.दोन्ही उपमुख्यमंत्री संवादात कच्चे आहेत की, मुख्यमंत्र्यांचाच आमच्यासोबतचा संवाद कमी आहे? हे शोधावं लागणार आहे. तसेच, असं मत व्यक्त करण्याचं मुख्यमंत्र्यांचं टाइमिंग नक्कीच चुकलं असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी खुश होण्याचा कारण नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.










