पाकसाठी हेरगिरी करायचा भारतीय लष्करातील जवान, गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटक करुन नोकरीतून बडतर्फ.

राष्ट्रीय तपास संस्थेने सीआरपीएफ जवानाला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. मोतीराम जाट असे त्याचे नाव असून, न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. गोपनीय माहिती पुरवल्याबद्दल त्याला पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून पैसे मिळत होते.पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाला अटक केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. मोतीराम जाट असे या जवानाचे नाव आहे. विशेष न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत ‘एनआयए’ कोठडी दिली आहे.मोतीराम हा २०२३ पासून पाकिस्तानी गुप्तहेर अधिकाऱ्यांना भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती देत होता. त्यासाठी मोतीराम याला पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून पैसे मिळत होते.

त्याला दिल्लीत अटक करून ‘एनआयए’ने त्याची चौकशी सुरू केली आहे, असे ‘एनआयए’ अधिकाऱ्यांनी सांगितले.‘सीआरपीएफ’मध्ये मोतीराम हा सहायक उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होता. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचे उघड होताच ‘सीआरपीएफ’ने त्याला सेवेतून बडतर्फ केले आहे. समाजमाध्यमावरील त्याच्या वावरावर ‘सीआरपीएफ’बरोबरच केंद्रीय तपास यंत्रणांनी बारीक लक्ष ठेवले होते. ‘सीआरपीएफ’चे नियम आणि शिष्टाचाराचे त्याने उल्लंघन केल्याचे आढळले. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ‘एनआयए’च्या ताब्यात देण्यात आले, असे ‘सीआरपीएफ’ने निवेदनात म्हटले आहे. मोतीराम याला ‘सीआरपीएफ’च्या नियमांतील तरतुदींनुसार २१ मे २०२५ पासून बडतर्फ करण्यात आल्याचे या निवदेनात नमूद करण्यात आले आहे.

‘एनआयए’ने मोतीराम याला अटकेनंतर दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत ‘एनआयए’ कोठडी दिली आहे. त्यामुळे त्याच्या ‘एनआयए’ चौकशीतून अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे सूत्रांनी सांगितले.हेरगिरीच्या आरोपावरून अटकेत असलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश हिस्सार न्यायालयाने सोमवारी दिला. ज्योतीला १६ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर तिच्याबरोबर १२ जणांना पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपावरून अटक केली होती. ज्योतीला दोन वेळा पोलिस कोठडी सुनावली. तिच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तिला सोमवारी न्यायालयात हजर केले. त्या वेळी तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.