महिलांसाठी प्रबोधन समिती गठीत व्हावी यासाठी मनसेने दिले रूपाली चाकणकर यांना निवेदन.

महिलांसाठी प्रबोधन समिती गठीत व्हावी यासाठी मनसेने दिले रूपाली चाकणकर यांना निवेदन

आशिष उत्तमराव सपकाळे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव उप महानगराध्यक्ष आपणास एका महत्त्वाच्या विषयावर निवेदन देवी इच्छितो आणि लक्ष केंद्रित करू इच्छितो ,काही वर्षापासून जळगाव जिल्हा मध्ये तरुणी ज्यांचे वय वर्ष 14 ते 27 -28 वयातील विद्यार्थिनी व महिलांवर अत्याचाराचे आत्महत्येचे व कमी वयात पळून जाण्याचे घर सोडून पळून जाण्याचे प्रमाण जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेले आहे , तरी या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे 13 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना या संदर्भात प्रबोधन समिती घटित व्हावी यासाठी आमच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले होतं, तसेच 8 सप्टेंबर 2024 रोजी राज्यपाल महाराष्ट्र सी. पी. राधाकृष्णन यांच्याही जळगाव दौऱ्यावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्यासमोर मांडला असता त्यांनी अस्वस्थ केलं की विषयात अति गांभीर्य असून याच्यावर चर्चा करून अति जलद निर्णय घेण्यात येईल, अशी त्यांनी ग्वाही दिली होती .
त्या अनुषंगाने आपण महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि एक सबल नेतृत्व असलेले महिला असून त्यासाठी आम्ही तुमच्याकडे विद्यार्थिनींचा महिलांचा असा प्रकार थांबवावा.

आमची मागणी अशी आहे की जिल्ह्यात प्रबोधन समिती गठीत करावी त्यात निवृत्त न्यायाधीश , निवृत्त मनसोपचार डॉक्टर्स, निवृत्त प्राध्यापक, निवृत्त आयएएस, आयपीएस अधिकारी, आणि काही स्वयंसेवक स्वयंसेविका या प्रबोधनकार समितीमध्ये घ्यावा आणि प्रत्येक महिन्याला शाळेत व महाविद्यालय येथे जाऊन मुलींना प्रलोभन करून कॉन्सलिंग करून आत्महत्या विषयी घर सोडून पळून जाण्याविषयी अत्याचारा विषयी त्यांची समजूत काढून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणे जेणेकरून हा प्रकाराला कुठेतरी आळा बसेल. अत्यंत दुर्दैवी गोष्ट म्हणजे मागील एका सर्वे नुसार महाराष्ट्रामध्ये आत्महत्या , पळून जाणे या प्रकारात जळगाव जिल्हा दुसरा क्रमांक वर आहे, आणि त्यात मागील वर्षी विद्यार्थी विद्यार्थिनींची आत्महत्या 280 ते 285 पर्यंत गेलेली आहे 20 टक्के शुल्लक कारणावरून आत्महत्या, 35 टक्के शैक्षणिक दबाव, 25% प्रेम प्रकरणातून 15 टक्के लैंगिक शोषणामुळे अशा प्रकारचे आत्महत्या जळगाव जिल्ह्यामध्ये होत आहे. आणि हा अति गांभीर्याचा विषय असल्याने आपण आमचा विषय जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर ही प्रबोधन समिती गठीत करून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला शाळेत महाविद्यालयात येथे जाऊन ही टीम प्रबोधन करेल अशा पद्धतीने हे काम मार्गी लागलं पाहिजे. अशी मी आपणास कळकळीची मनसे विनंती करतो, आणि लवकरात लवकर ही समिती घटित होऊन महाराष्ट्राच्या विद्यार्थी विद्यार्थिनी महिलांना अमृत दान देऊन आपण त्यांचा जीव वाचवू शकतो .

मनसे उप महानगराध्यक्ष आशिष उत्तमराव सपकाळे जळगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबत विनोद शिंदे शहराध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा संघटक श्रीकृष्ण मेंगडे शहर संघटक योगेश पाटील जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना कल्पेश पवार विद्यार्थी सेना चेतन पवार अनिल दिघे राजू डोंगरे शहर सचिव खुशाल ठाकूर राहुल चव्हाण शहर उपसंघटक निलेश वाणी विभाग अध्यक्ष साजन पाटील उपजिल्हा संघटक अनिल दिघे हरिओम सूर्यवंशी दीपक राठोड आणि आजी-माजी पदाधिकारी व सर्व संघटनेचे अधिकारी उपस्थित होते

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.