गाते (ता. रावेर) येथील मूळ रहिवासी आणि डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथील माजी विद्यार्थी तुषार मंगला किशोर मोरे यांची नुकतीच मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे. तुषार गाते स्टेशन येथून दि . 25 में रोजी मुंबई येथे ट्रेनिंगसाठी रवाना झाला आहे . त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण गावात आणि विद्यालयात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गावच्या लोकनियुक्त प्रथम आदिवासी महिला सरपंच सारिका गणेश पाटील आणि त्यांचे पती गणेश पाटील यांनी तुषार मोरे यांचा विशेष सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. तुषारने सर्व जेष्ठ नागरिक, माता-भगिनी, मित्रमंडळी यांचे शुभेच्छा आणि आशीर्वाद घेतले.










