शरद पवार आमच्या सोबत आले असते तर या देशाचे ते राष्ट्रपती होऊ शकले असते, आताही शरद पवारांचे स्वागतच आहे, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट (NCP Sharad Pawar Faction) आणि अजित पवार गट (NCP Ajit Pawar Faction) देखील एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठं वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.रामदास आठवले म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते आणि आजही एकत्र आहेत. अजित पवारांचं म्हणणं एकच होतं की, तुम्हाला शिवसेना चालते तर भाजप का चालत नाही?










