बार्शी शहर पोलिसांनी २७ वर्षांपासून खून प्रकरणात फरार असलेल्या विनायक फुरडे या आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने फुरडे याला ५ वर्षांची सक्तमजुरी आणि दंड ठोठावला होता, परंतु तो जामीनानंतर फरार झाला होता. पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला त्याच्या मूळ गावी कांदलगाव येथे मोठ्या शिताफीने अटक केली.बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणात तब्बल २७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केले आहे. विनायक साहेबराव फुरडे (रा. कांदलगाव, सध्या रा. ढाकेवाडी, कसबापेठ, बार्शी) असे आरोपीचे नाव आहे.याला जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर यांनी ५ वर्षांची सक्तमजुरी व रु. २०००/- दंड अशी शिक्षा ठोठावली होती.सदर शिक्षेविरोधात आरोपीने उच्च न्यायालय, मुंबई येथे जामीना करिता अर्ज दाखल केले होते. त्यानुसार आरोपीला जामीन मंजूर झाला होता. मात्र आरोपी न्यायालयात हजर न राहता मुंबई व ठाणे परिसरात राहू लागला. यानंतर आरोपी फरार झाला होता.










