या हल्ल्यांमध्ये 11 पाकिस्तानी लष्करी जवान मारले गेले आणि 78 जण जखमी झाले, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचा आणखी एक प्रताप उघडकीस आलाय. पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत केलेल्या हल्ल्यात मसूद अजहरच्या जैश ए मोहम्मदचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केलं. आता पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारनं ऑपरेशन सिंदूरमध्ये नष्ट झालेल्या दहशतवादी अड्ड्यांचे पुर्नवसन करण्याची घोषणा केलीय. त्यासोबतच मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई दिली जाईल व जखमींना 10 लाख ते 20 लाख पाकिस्तानी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. (Masood Azhar) या घोषणेमुळे पाकिस्तानचे वास्तव संपूर्ण जगासमोर आले आहे. दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्ताननं आता कोणत्याही थराला जाण्यास सुरुवात केलीय. पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मोठी पोस्ट केली असून दहशतवाद्यांना भरपाई आणि दहशतवाद्यांना लपणाच्या ठिकाणांची पुर्नबांधणी करण्यात आलीय. 6 व 7 मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले. ज्यात भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवादी छावण्यांचा समावेश आहे. या दहशतवादी अड्ड्यांमध्ये भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखण्यात आली होती.










