जळगाव येथे बॅग लिफ्टींग करणारे आरोपी काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

जळगाव येथे बॅग लिफ्टींग करणारे आरोपी काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

(प्रतिनिधी शाहिद खान) जळगाव शहरातील दादावाडी जैन मंदिराजवळ दिनांक ०९/०९/२०२४ रोजी सकाळी १०.३० वा.च्या सुमारास बॅग लिफ्टींग झाल्याचे  बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती भेटली त्यांनी सदर घटनास्थळी IDBI बँकेचे ATM जवळ फिर्यादीस भेटून त्यांना सविस्तर विचारपुस केली असता, मोटरसायकल क्र. MH19EH9974 वरील तीन अज्ञात इसमांनी फिर्यादीचे i20 गाडीत बसलेल्या फिर्यादीचे मुलाचे लक्ष विचलीत करून गाडीतील बॅग मध्ये ठेवलेले 1,20,000/- रु. किमितीची बॅग गाडीतून चोरुन नेल्याचे प्रकार समोर आलेले आहे.
त्यावर  बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्ष (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांनी पो.उप.निरी  दत्तात्रय पोटे, सफो रवि नरवाडे, विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, अतुल वंजारी, पो.ह. राजेश मेंढे, हरिलाल पाटील, विजय पाटील, ईश्वर पाटील, महेश सोमवंशी सर्व नेम. स्था.गु.शा जळगाव अशांना कळवून तात्काळ मोटर सायकल वरील तिन अज्ञात इसमांचा शोध घेणे बाबत आदेश दिलेत.

त्यावरून सदर पथकाने तांत्रिक पध्दतीने व बौध्दीक कौशल्याचा वापर करून, मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे मो.सा.क्र. MH१९EH९९७४ वरील तिन अज्ञात इसम हे भुसावळ कडे गेल्याचे समजल्याने त्यांचा पाठलाग करीत असतांना भुसावळ गावापासून बोदवड कडे जाणाऱ्या रोडने जात असतांना सदरचे इसम हे मो.सा.ने पुढे जात असल्या बाबतची तांत्रिक माहिती मिळाल्याने त्यांचा पाठलाग सुरु ठेवला त्यावेळी मोढाळे गावाचे पुढे साधारण १ कि.मी. अंतरावर कच्चा रस्त्याने त्यांनी त्यांची मो.सा. वर जात असतांना वरील पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा व आवाज दिला असता त्यांनी गाड्या रस्त्यावर सोडून कपाशाच्या व मक्याच्या शेतामध्ये पळू लागले त्यावेळी वर पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी त्यांचा पाठलाग करून कापशाच्या व मक्याच्या शेतामधुन तिन इसमांना ताब्यात घेतले.
त्यावेळी त्यांना त्याचे नाव विचारले असताना त्यांनी त्याचे नाव अनुक्रमे १) असे सांगीतले त्यावेळी त्यांना वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्यांनी सदर गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याचे कडून 1,20,000/- रु. रोख रक्कम हस्तगत करण्यात आल्याने त्यांना रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले मोटार सायकल हे पुढील तपासकामी जळगाव तालुका पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव,  अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव,  संदिप गावीत, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग,  बबन आव्हाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.