दिनांक १२.५.२०२५ रोजी बुध्द पौर्णिमा निमित्त यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक जमीर शेख, व सहाय्यक वनसंरक्षक चोपडा प्रथमेश हाडपे यांच्या संकल्पनेतून यावल वनविभागातील चोपडा वनक्षेत्र पासुन ते रावेर वनक्षेत्र पर्यंत ठिकठिकाणी जंगल भागात प्राणी गणनेसाठी मचान तयार करण्यात आलेले आहेत. यावल वनविभागात चोपडा वनक्षेत्रात ०३ मचान, वैजापुर वनक्षेत्रात ०७ मचान, अडावद वनक्षेत्रात ०५ मचान, देवझिरी वनक्षेत्रात ०५ मचान, यावल पुर्व वनक्षेत्रात ०६ मचान, यावल पश्चिम वनक्षेत्रात ०५ मचान तर रावेर वनक्षेत्रात ८ मचान असे एकुण ३९ मचान यावल वनविभागात तयार करण्यात आलेले आहेत. सदर मचाण वर ३ ते ४ व्यक्ती एका वेळेस बसु शकतात. बुध्द पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपुर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यावल वनविभागात वन्यप्राण्यांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गणना केली जाते, ज्यामध्ये ट्रॅप कॅमेऱ्याव्दारे गणना केली जात असुन नवखे निसर्गप्रेमी, वन्यजीव अभ्यासक तसेच विदयार्थी यांना देखील संपूर्ण रात्र जंगलात थरारक अनुभव लुटता यावा तसेच मचानावरुन वन्यजीवांची गणना करता यावी म्हणुन यावल वनविभागाच्या वतीने निसर्ग अनुभवाचे आयोजन केले आहे.










