शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतदादा पोळ यांचे खेळाडूंना मार्गदर्शन व गणवेश वाटप.

शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतदादा पोळ यांचे खेळाडूंना मार्गदर्शन व गणवेश वाटप.  महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र तसेच जळगाव जिल्हा खो-खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने खो-खो या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देणे, विविध आधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करणे आणि खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर नेणे हा मुख्य उद्देश होता. प्रशिक्षण शिबिराचे आयोजन २६ एप्रिल ते ५ मे २०२५ या कालावधीत करण्यात आले. या शिबिरास शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारप्राप्त क्रीडा मार्गदर्शक गणपतदादा पोळ सर यांनी भेट देऊन उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले.

शिबिरांच्या समारोप प्रसंगी जिल्हा खो खो क्रीडा प्रशिक्षण केंद्रांतर्गत सराव करणा-या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी उपलब्ध करुन दिलेले क्रीडा गणवेश शिवछत्रपती पुरस्काची गणपतराव पोळ यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी पोळ यांचा सत्कार केला.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेचे सहसचिव जयांशु पोळ, राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात, क्रीडा अधिकारी सुरेश थरकुडे, जळगांव जिल्हा खो खो संघटनेचे सचिव राहुल पोळ तसेच राष्ट्रीय पंच दिलीप चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छगन बारेला, केतन चौधरी, चैतन्य पोळ, मोहित, प्रथमेश, हिंमाशु यांनी सहकार्य केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.