दोन चित्ते घेतले दत्तक, गेंड्याच्या पिल्लाला दिलं नाव; पर्यावरणप्रेमी असलेली ही चिमुकली आहे बॉलिवूडची सुपरस्टार.

फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली बॉलिवूडची सुपरस्टार असून ती पर्यावरणप्रेमीसुद्धा आहे. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घेऊया.या फोटोत दिसणाऱ्या लहान मुलीला तुम्ही ओळखता का? फोटोमध्ये दिसणारी ही चिमुरडी आज एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीनं दाक्षिणात्य सिनेमांसोबतच हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्याचबरोबर ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. दोनदा लग्न केलेल्या या अभिनेत्रीला एक सावत्र मुलगी देखील आहे. जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्दल.फोटोमध्ये दिसणारी ही चिमुरडी दुसरी तिसरी कोणी नसून दिया मिर्झा आहे. दिया मिर्झाचा आता ४३ वर्षांची असून तिचा जन्म हैदराबादमध्ये झाला. तिचे वडील फ्रँक हॅन्ड्रिच हे जर्मन डिझायनर होते आणि आई दीपा बंगाली होती. दिया साडेचार वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला.

यानंतर अभिनेत्रीच्या आईने अहमद मिर्झाशी दुसरं लग्न केलं. २००३ मध्ये त्यांचं निधन झालं. दियाने तिच्या नावापुढे त्यांचं आडनाव जोडलं आहे.हैदराबादमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर दियाने मॉडेलिंग सुरू केलं आणि टीव्ही जाहिरातींमध्येही दिसली. २००० मध्ये मिस इंडिया स्पर्धेत ती दुसरी उपविजेती होती. त्यानंतर अभिनेत्रीने ‘रहना है तेरे दिल से’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात प्रवेश केला. ती ‘दीवानापन’, ‘तुमको ना भूल पायेंगे’, ‘तुमसा नहीं देखा’, ‘संजू’ आणि ‘काफिर’ या वेब सीरिजसह अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. अभिनेत्री असण्यासोबतच, दिया एक निर्माती देखील आहे.

२०११ मध्ये तिनं बॉर्न फ्री एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस सुरू केलं.दियाला पर्यावरणाची आवड असून २०१० मध्ये तिने उत्तर प्रदेशातील लखनौ प्राणीसंग्रहालयातून दोन चित्ताचे पिल्लू दत्तक घेतले. तिनं या शावकांची नावं अशोक आणि नक्षत्र ठेवली. दियाने एका गेंड्याच्या बाळाचं नावही स्वतःच्या नावावरून ठेवलं आहे.दियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर २०१४ मध्ये तिचा बिझनेस पार्टनर सहल संघासोबत लग्न झालं. पण हे नातं फार काळ टिकलं नाही आणि त्यांनी २०१९ मध्ये घटस्फोट घेतला. फेब्रुवारी २०२१ मध्ये, दियाने उद्योगपती वैभव रेखीशी दुसरं लग्न केलं असून तिला एक मुलगासुद्धा आहे. वैभवला त्याच्या आधीच्या लग्नापासून एक मुलगी असून तिचं नाव समायरा आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.