महामुंबईसाठी मोर्चेबांधणी; ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेशाचा धडाका.

मुंबई महानगरातील सत्तेसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीतून पक्षप्रवेशांचा धडाका सुरू आहे.लोकसभा, निवडणुकांमधील विधानसभा यशानंतर शिवसेनेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता काबीज करण्यासाठी आता कंबर कसली आहे. मुंबई महानगरातील सत्तेसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीतून पक्षप्रवेशांचा धडाका सुरू आहे.गुरुवारी रात्री ठाण्यात टेंभी नाका येथील आनंदाश्रमात नवी मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. यावेळी आगामी काळात शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू राहील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्यातून शिवसेनेतील फुटीनंतर तीन नगरसेवकांचा अपवाद वगळता सर्वच माजी नगरसेवकांनी शिंदे यांना साथ दिली.

यासोबत मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, मिरा-भाईंदर, वसई-विरार या महापालिकांमधील ठाकरे गटासह इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. तसेच उर्वरित माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत. शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी अशा पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशासाठी रणनिती आखली आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेसह पर्यायाने महायुतीलाही या ‘पक्षप्रवेशा’चा फायदा होण्याची शक्यता आहे.’नवी मुंबईतील रतन मांडवे, सुनीता मांडवे या माजी नगरसेवकांनी खऱ्या शिवसेनेच्या मांडवात प्रवेश केला आहे. त्यांचे मनापासून स्वागत करतो,’ अशा शब्दांत गुरुवारी रात्री टेंभी नाका येथील आनंदाश्रमात पक्षात स्वागत केले. गेल्या आठवड्यात नवी मुंबईत पक्षप्रवेश झाले. या कार्यक्रमात तुम्ही नसल्याने बरीच उलटसुलट चर्चा सुरू होती.

मात्र मला विश्वास होता की, रतन मांडवे दुसऱ्या मांडवात जाणार नाही, अशी टिप्पणी शिंदे यांनी याप्रसंगी केली. ठाकरे गटाचे १०० टक्के नगरसेवक नवी मुंबईतून खऱ्या शिवसेनेत दाखल झाले आहेत, असेही शिंदे यांनी नमूद केले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, संजय मोरे, उपनेते विजय नहाटा, नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर उपस्थित होते.एकीकडे शिवसेनेतील पक्षप्रवेशांचा धडाका कायम असताना, नवी मुंबईत महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे, असे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे आगामी निवडणुका महायुतीकडून एकत्रित लढवण्याचे संकेत मिळाले आहेत. नवी मुंबईतील एकूण ५५ नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. केवळ नवी मुंबईच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून अनेक जण शिवसेनेत येत आहेत, असे शिंदे म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.