पोहता येत नसतानाही विहिरीत उतरले, ४० फूट खोल पाण्याचा अंदाज चुकला आणि… सांगलीत हळहळ.

सांगली जिल्ह्यात विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू झाला. ते पोहण्यासाठी विहिरीत उतरले, पण बुडाले. रेस्क्यू टीमने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. आष्टा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दोघांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा सांगलीच्या वाळवा तालुक्यातील खोतवाडी या ठिकाणी बुडून मृत्यू झाला आहे. केराप्पा धोंडीराम बागडी, वय वर्ष २७ आणि अजय पप्पन बागडी, वय वर्ष १९ राहणार दोघेही, नागाव रोड झोपडपट्टी, आष्टा, अशी मृत तरुणांची नावं आहेत. दोघे ही दुपारच्या सुमारास खोतवाडी येथे एका शेतात असणाऱ्या विहिरीमध्ये पोहोण्यासाठी गेले होते, मात्र पोहता येत नसल्याने या दोघांचाही बुडून मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळतात रेस्क्यू फोर्स टीमकडून ४० फूट खोल विहिरीतून अथक प्रयत्नानंतर दोघांना शोधून काढण्यात आलं आहे. सदर घटनेची नोंद आष्टा पोलिसांत नोंद झाली आहे.३० एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास नागाव रोडवरील वसाहती मधील पाच ते सहा तरुण बागणी रस्त्यावरील जगन्नाथ धोंडीराम मस्के यांच्या विहिरीत पोहायला गेले होते. यामधील केरप्पा बागडी याला पूर्णपणे पोहायला येत नव्हतं. विहिरीत केरबा बागडी बुडायला लागला आणि त्याने पुतण्या अजय बागडीला मिठी मारली. तेथील इतर तरुणांना लक्षात आलं नाही की दोघेही बुडत आहेत. बराच वेळ झाला दोघेही पाण्याच्या बाहेर आले नाहीत. त्यानंतर इतर तरुणांना ते विहिरीतील खोल पाण्यात बुडाल्याचं समजलं.

इतर मुलांनी आरडाओरडा केला असता वेळ निघून गेली होती. दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.विहिरीत पाणी जास्त असल्यामुळे त्या दोघांना पाण्यातून बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर स्पेशल रेस्क्यू फोर्सला तात्काळ बोलावून त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे दोघेही तरुण मजुरी करून चिनीमातीच्या बरण्या विकून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अजय बागडे याच्या वडिलांचं निधन झालं आहे. घरी तो आणि आई दोघेच राहत होते. तर केररप्पाच्या कुटुंबात आई-वडील, भाऊ, पत्नी, लहान मुलगा, मुलगी आहेत. रात्री उशिरा तपासणीनंतर मृतदेह कुटुंबांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.